CoronaAurangabadUpdate : दिवसभरात 254 नवे रुग्ण , जिल्ह्यात 12833 कोरोनामुक्त, 3909 रुग्णांवर उपचार सुरू , 562 जणांचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात आज 296 जणांना (मनपा 182, ग्रामीण 114) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 12833 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 254 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17304 झाली आहे. आजपर्यंत एकूण 562 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3909 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सकाळनंतर 179 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 49, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 24 आणि ग्रामीण भागात 84 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
ग्रामीण (89)
पळशी, सोयगाव (1), लक्ष्मी नगर, पैठण (1), औरंगाबाद (11), फुलंब्री (1),गंगापूर (34), कन्नड (13), सिल्लोड (14), वैजापूर (4), पैठण (6), सोयगाव (1), रांजणगाव (1), खुलताबाद (1), खंडोबा मंदिर परिसर, गंगापूर (1)
सिटी एंट्री पॉइंट (49)
बजाज नगर (4), छत्रपती नगर (1), टीव्ही सेंटर (1), म्हाडा कॉलनी (1), सेंट्रल नाका (1), गंगापूर (1), वडगाव (1), गारखेडा (1),चित्तेगाव (1), सांजखेडा (1), नवाबपुरा (1), सिडको साऊथ सिटी (2), सिडको महानगर (1), रांजणगाव (2), छावणी (1), सिल्लोड (2), मयूर पार्क (2), वानखेडे नगर (1), शिवना (3), फर्दापूर (1), जाधववाडी (2), पडेगाव (2), बाळापूर (1), सावित्री लाँन्स (1), एन नऊ (1), नक्षत्रवाडी (1), सातारा परिसर (2), कोलठाण वाडी (1), हनुमान नगर (1), आंबेडकर नगर (2), कन्नड (2), हर्सूल (1), उल्कानगरी (2), गंगापूर, जहांगीर (1)
मनपा (17)
रेल्वे स्टेशन परिसर (1), गणेश कॉलनी (2), पद्मपुरा (1), भावसिंगपुरा (1), भारत नगर, गारखेडा (1), प्रज्ञा नगर, लक्ष्मी कॉलनी (1), मारोती नगर, मयूर पार्क जवळ (1), पवन नगर, हडको (1), सीआरपीएफ ग्रुप, सातारा परिसर (1), सीआरपीएफ कॅम्प, सातारा परिसर (1), गंगा हॉस्टेल, एमजीएम परिसर (1), नरेंद्र सो., एन सात सिडको (1), एन एच हॉस्टेल (2), इटखेडा (1), पन्नालाल नगर (1)
चार कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत गंगापूर तालुक्यातील आंबेगाव येथील 80, शहरातील गजानन नगर, गारखेडा परिसरातील 68, एकनाथ नगरातील 86 वर्षीय पुरूष आणि सिल्लोड तालुक्यातील स्नेह नगर येथील 65 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.