Aurangabad CurrentNewsUpdate । ताजी बातमी…. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह ७ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…..

औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. नव्या आदेशानुसार उदय चौधरी यांची मुख्यसचिव कार्यालयात उपसचिव म्हणून बदली करण्यात अली असून विभागीय आयुक्तांच्या सल्ल्याने जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार सक्षम अधिकाऱ्याकडे सोपवून त्यांना तत्काळ रुजू होण्याचे आदेश अप्पर मुख्यसचिव सीताराम कुंटे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी 19 एप्रिल 2018 रोजी औरंगाबाद जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांची प्रशासकीय सेवेची सुरुवात 22 ऑगस्ट 2012 रोजी गडचिरोली येथून सहायक जिल्हाधिकारी पदापासून झाली. त्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वर्धा आणि ठाणे येथे काम केले. औरंगाबाद जिल्हाधिकारी पदी येण्यापूर्वी ते सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.