CoronaAurangabadUpdate : जिल्ह्यात 3640 रुग्णांवर उपचार सुरू, 71 रुग्णांची वाढ

जिल्ह्यातील 71 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 13440 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 9338 बरे झाले, 462 जणांचा मृत्यू झाला. तर 3640 जणांवर उपचार सुरु आहेत.
ग्रामीण भागातील अँटीजनचाचणीद्वारे आढळलेल्या 38 रुग्णांचा समावेश आहे. रुग्णांचा जिल्ह्यातील भागांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
ग्रामीण (41)
पाचोड,पैठण (2), नूतन कॉलनी, गंगापूर (1), औरंगाबाद (9), फुलंब्री (1), सिल्लोड (2), वैजापूर (15), पैठण (7), सोयगाव (4)
मनपा (30)
बैजिलाल नगर (1), सिडको परिसर (1), मुकुंदवाडी (1), जवाहर कॉलनी (1) पंचशील नगर (2), रोशन सो., गारखेडा (1), उल्कानगरी (4), एन सहा सिडको (6), संघर्ष नगर, मुकुंदवाडी (3), सिद्धार्थ नगर (5), गवळीपुरा (1), राम नगर (1), एन सात, अयोध्या नगर (1), गारखेडा परिसर (2)
चार कोरोनबाधितांचा मृत्यू
खासगी रुग्णालयांत सिल्लोड तालुक्यातील समता नगर, शिक्षक कॉलनीतील 58 वर्षीय पुरूष, औरंगाबाद शहरातील कैसर कॉलनीतील 59 वर्षीय पुरूष, रोशन गेट येथील 70 वर्षीय पुरूष आणि फाजलपु-यातील 46 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.