Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaLatestUpdate 12347 : दिवसभरात 12 मृत्यू , जिल्ह्यात 7178 कोरोनामुक्त, 4743 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 488 जणांना (मनपा 466, ग्रामीण 22 सुटी देण्यात आली. आजपर्यंत 7178 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 322 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12347 झाली आहे. आजपर्यंत एकूण 426 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4743 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुपारनंतर 196 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 26, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 111 आणि ग्रामीण भागात 55 आढळलेले आहेत. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

दरम्यान जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मात्र व्यापक जनजागृती आणि ॲण्टीजेन चाचण्यांमुळे कोरोना आटोक्यात आल्याचा दावा केला असून ९ दिवसांच्या कडक लॉकडाऊन नंतरही रुग्णांची संख्या वाढली तेंव्हा शहराचे जिल्हाधिकारी , महापालिका प्रशासक आणि पोलीस आयुक्त यांनी शहराचा मृत्युदर कमी झाल्याचा अजब दावा केला होता तर दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असून पुन्हा काही अभ्यास करून रुग्ण कमी झाल्याचे गणित मांडले आहे.

मनपा हद्दीतील रुग्ण (3)

मोनार्क सो., एन बारा (1), एन चार सिडको (1) , पडेगाव (1)
ग्रामीण भागातील रुग्ण (56)
प्रसाद नगर, सिल्लोड (1), औरंगाबाद (2), गंगापूर (15), कन्नड (1), खुलताबाद (1), वैजापूर (26), पैठण (10)
सिटी एंट्री पॉइंट (26)
करमाड (2), झाल्टा (7), संघर्ष नगर (2), बारी कॉलनी (1), वैजापूर (2), बनेवाडी (2), बजाज नगर (5), जोगेश्वरी (1), मिसारवाडी (1), एन अकरा (1), बीड बायपास (1), भावसिंगपुरा (1)

तीन कोरोनाबाधिताचा मृत्यू

शहरातील खासगी रुग्णालयात लोटाकारंजा 49 वर्षीय पुरूष, शिवाजी नगर, गारखेडा परिसरातील 52 वर्षीय पुरूष, बालाजी नगरातील 57 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

UPDATE: 3:15 PM

जिल्ह्यात 5038 रुग्णांवर उपचार सुरू, 25 रुग्णांची वाढ
औरंगाबाद, दि. 23 (जिमाका) : जिल्ह्यातील 25 रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 12151 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 6690 बरे झाले, 423 जणांचा मृत्यू झाला. तर 5038 जणांवर उपचार सुरु आहेत.

मनपा हद्दीतील रुग्ण (20)
पोलिस कॉलनी, मिल कॉर्नर (2), टीव्ही सेंटर (1), कासलीवाल गार्डन, मुकुंदवाडी (1), मामा चौक (1), अशोक नगर, मयूर पार्क (1), एन बारा हडको (3), हर्सुल टी पॉइंट (1), एसआरपीएफ परिसर (10)
ग्रामीण भागातील रुग्ण (5)
गंगापूर (1), पिशोर रोड, कन्नड (2), फुलंब्री (1), सिल्लोड (1)

सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत राम नगरातील 32 वर्षीय पुरूष, सिडको मुकुंदवाडीतील 55 वर्षीय पुरूष, विविध खासगी रुग्णालयांत सेव्हन हिल परिसरातील 56 वर्षीय पुरूष, पैठण गेट येथील 55 वर्षीय स्त्री, मित्र नगरातील 62 वर्षीय स्त्री, मिसरवाडीतील 40 वर्षीय स्त्री कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

MorningUpdate

जिल्ह्यात 5019 रुग्णांवर उपचार सुरू, 101 रुग्णांची वाढ

औरंगाबाद  जिल्ह्यातील 101 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 12126 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 6690 बरे झाले, 417 जणांचा मृत्यू झाला. तर 5019 जणांवर उपचार सुरु आहेत.
आढळलेल्या रुग्णामध्ये सिटी एंट्री पाँइंटवरील 04 कोरोनाबाधितांचा समावेश आहे. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा हद्दीतील (80)
विठ्ठल नगर (2), गांधी नगर (10), दलालवाडी (2), राम नगर (6), सावित्री नगर, हर्सुल (6), कुंभार गल्ली, हर्सुल (1), पडेगाव (4), स्वामी विवेकानंद नगर (3), कैसर कॉलनी (2), टाइम्स कॉलनी (1), अविष्कार कॉलनी, एन सहा (1), पुंडलिक नगर (1), छावणी (1), पद्मपुरा (1), क्रांती नगर (1), बन्सीलाल नगर (4), बनेवाडी (3), छावणी (1), मयूर पार्क (1), उस्मानपुरा (1), शिवशंकर कॉलनी (5), गुलमोहर कॉलनी, एन पाच (2), विश्व भारती कॉलनी (2), हनुमान नगर, गल्ली नं. पाच (1), विष्णू नगर (1), ठाकरे नगर, एन दोन सिडको (2), एन दोन, जिजामाता कॉलनी (1), बालाजी नगर (2), एसआरपीएफ परिसर (1), हिमायत बाग परिसर (2), जवाहर कॉलनी (1), सिल्क मिल कॉलनी (1), गणेश नगर (1), एसबी मुलांचे वसतिगृह परिसर (1), दर्गा रोड परिसर (1), देवगिरी नगर, सिडको (2), अन्य (2)
ग्रामीण भागातील रुग्ण (17)
कन्नड (1), साराभूमी परिसर, बजाज नगर (2), वडगाव, बजाज नगर (2), इंद्रप्रस्थ कॉलनी (1), राजवाडा, गंगापूर (2), इंदिरा नगर, वैजापूर (1), इंगळे वस्ती, वैजापूर (1), घायगाव (1), परदेशी गल्ली, वैजापूर (1), कमलापूर (1), अंभई (1), प्रसाद नगर, सिल्लोड (1), रांजणगाव (2)
सिटी एंट्री पॉइंटवरील रुग्ण (4)
छावणी (1), अन्य (3)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

शहरातील एका खासगी रुग्णालयात बीड बायपास रोडवरील 64 वर्षीय पुरूष, अन्य एका खासगी रुग्णालयात वंजारवाडीतील 70 वर्षीय स्त्री आणि 80 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!