AurangabadCoronaUpdate : चिकलठाणा कोविड केअर सेंटर व गोलवाडी नाक्याची उपायुक्त यांच्याकडून पाहणी

कोरोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या जनता कर्फ्यू ला दुसऱ्या दिवशी जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . आवश्यक सेवा ,शासकीय यंत्रणा व प्रेस वगळता रस्त्यावर दिवसभर शुकशुकाट होता. जनतेचा सहभाग असेल तर गोष्टी किती सोप्या होऊन जातात अशी भावना उपायुक्त वर्षा ठाकूर यांनी व्यक्त केली.
आज चिकलठाणा येथील कोविड केअर सेंटर व गोलवाडी चेक नाक्याला उपायुक्त वर्षा ठाकूर यांनी भेट दिली यावेळी त्यांच्यासह उपजिल्हाधिकारी सरिता सूत्रावे तसेच इतर अधिकारी होते . यावेळी त्यांनी रुग्णांशी संवादही साधला. पॉझिटिव्ह रुग्ण व लहान मुलांशी संवाद साधताना त्यांच्या मनात भीती तर दिसलीच नाही पण डॉक्टर नर्स याबद्दलची कृतज्ञता त्यांच्या डोळ्यातून झळकली. या महामारी च्या काळात आपल्याला हा आजार होऊ शकतो हे माहीत असताना येथील वैद्यकीय अधिकारी आणि टीम लढत आहे .या टीम ची बांधीलकी खरोखरच कौतुकास्पद असून इतरांना प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी रुग्णालयातून डिस्चार्ज होऊन घरी निघालेल्या काही रुग्णांचे मनोगत ऐकून त्यांचे डोळे पाणावले व या महामारी च्या संकटात काम करण्याची व खारीचा सहभाग करायलाही संधी मिळत आहे ही भावना स्पर्शुन गेल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
गोलवाडीत नाक्या ला सुद्धा महानगपालिकेची डॉक्टर टीम अँटिजेंन टेस्टिंग करत होती ,पोलीस नाकाबंदी करत होते पत्रकार मंडळी हे दृश्य टिपत होती , महसूल अधिकारी पाहिजे ते मदत करण्यासाठी कॅन्टीनमेंट झोन मध्ये फिरत होते ,यंत्रणेतील प्रत्येक जण आपले कर्तव्य पार पाडत आहे. असे त्यांनी सांगितले.