AurangabadCrimeUpdate : बक्षीस म्हणून पाच हजाराची मागणी करणारा हवालदार एसीबीच्या जाळ्यात

औरंगाबाद : तक्रारदार महिलेने दाखल केलेल्या गुन्हयात आरोपी विरूध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केल्याचे बक्षीस म्हणून 5000/- रूपये लाचेची मागणी करून स्वतः स्वीकारताना उस्मानपुरा पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी दामू गाडे यास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचून अटक केली. सदर तक्रारदार महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर शिवाजी गाडे याने तपस करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते त्याबद्दल तक्रारदार महिलेकडे आरोपी शिवाजी गाडे 5,000/-रूपयांची मागणी करीत होता .
याबाबतची तक्रार फिर्यादी महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे करताच , ला.प्र. वि. औरंगाबादचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, डाॅ. अनिता जमादार, अप्पर पोलीस अधीक्षक, पो उप अधीक्षक ब्रह्मदेव गावडे ला. प्र. वि. औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनानुसार सापळा अधिकारी रेशमा सौदागर, पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि.औरंगाबाद यांनी आपली टीम पोना विजय ब्राम्हांदे, रवींद्र आंबेकर, पोशी अविल जाधव, औरंगाबाद यांच्यासह सापळा रचून शिवाजी गाडे याला 5,000/-रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडून त्याच्याविरुद्ध कारवाई केली.