AurangabadCoronaUpdate 6880 : लॉकडाऊनबद्दल आज बैठकीचे आयोजन , 150 रुग्णांची वाढ , जिल्ह्यात 3196 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 150 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील 101 तर ग्रामीण भागातील 49 रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये 85 पुरूष तर 65 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकुण 6880 कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी 3374 रुग्ण बरे झालेले असून 310 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने 3196 जणांवर उपचार सुरू आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या 934 स्वॅबपैकी आज 150 अहवाल सकारात्मक (Positive) आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. दरम्यान औरंगाबाद शहरात आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कडक लॉक डाऊन लावायचा का ? याबाबत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यानच्या काळात काही टीव्ही माध्यमांनी आणि एका वृत्तपत्राने शहरात संचारबंदी लागू होणार असल्याच्या बातम्या दिल्यामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून बाजारात प्रचंड प्रमाणात गर्दी वाढली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने कुठलाही खुलासा न केल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे. एरवी अफवांच्या बाबतीत जागरूक राहण्याच्या सूचना देणारे प्रशासन यावेळी माध्यमांनीच पसरविलेल्या अफवांबद्दल शांत राहिले येबाबत जेंव्हा प्रश्न उपस्थित करण्यात आला तेंव्हा कुठे रात्री सोमवारपासून कुठलाही कर्फ्यू लावण्यात यात नाही मात्र याबात सोमवारी निर्णय घेण्यात येणार असल्याचा खुलासा जिल्हा प्रशासनाने केला यामुळेही नागरिकात संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनच असे वागत असेल तर नागरिकांनी काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण –(101)
घाटी परिसर (1), जाधव मंडी (3), अरिष कॉलनी (3), सिडको एन-11 (3), दिल्ली गेट (1), गजानन नगर (4), पुंडलिक नगर (1), छावणी (2), किराणा चावडी (1), एन 11 हडको, (1), आदर्श कॉलनी गारखेडा (1), नाईक नगर (4), उस्मानपुरा (5), उल्कानगरी (2),शिवशंकर कॉलनी (8), एमआयडीसी, चिखलठाणा (1), मातोश्री नगर (2), नवजीवन कॉलनी (1), श्रध्दा कॉलनी (1), एन-6 (1), एन-2 सिडको, ठाकरे नगर (1), जटवाडा रोड (1), पोलिस कॉलनी (2), दशमेश नगर (7), वेदांत नगर (1), टिळक नगर (1), एन-9 सिडको (1), प्रगती कॉलनी (1), देवळाई, सातारा परिसर (2),जयभवानी नगर (3), अंबिका नगर (1), गजानन कॉलनी (3), पद्मपुरा (15), सिंधी कॉलनी (1),पडेगाव (2), सिल्क मिल कॉलनी (4), रेल्वे स्टेशन परिसर (4), टिव्ही सेंटर (4), अन्य (1),
ग्रामीण भागातील रुग्ण- (49)
विहामांडवा (1), सिध्देश्वर नगर, सुरेवाडी (1), कारंजा (1), वाळुज (1), हिरापुर सुंदरवाडी (3), स्वस्तिक सिटी, साजापुर, बजाजनगर (2), सावरकर कॉलनी, बजाज नगर (2), वडगांव बजाज नगर (2), निलकमल सोसायटी, बजाज नगर (4), साईश्रघ्दा पार्क, सिडको बजाजनगर (5), साऊथ सिटी, बजाज नगर (1), दिशा कुंज, वडगांव कोल्हाटी (1), सायली सोसायटी बजाज नगर (3), शिवाजी नगर, वडगाव कोल्हाटी (2), जिजामाता सोसा.बजाज नगर (3), पंचगंगा सोसा. बजाजनगर (1), विश्व विजय सो. बजाजनगर (2), डेमनी वाहेगांव (3), पैठण (3), इंदिरा नगर, वैजापुर (5), अजिंठा (2), शिवणा (1), याभागातील कोरोनाबाधित रुग्ण आहेत.