AurangabadCoronaUpdate : ताजी बातमी : औरंगाबाद 5 हजारच्या वर, जिल्ह्यात 2234 रुग्णांवर उपचार सुरू, मृत्यूची संख्या 247

औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 2556 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण 2234 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 271 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. यामध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रातील 173, ग्रामीण भागातील 98 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या रुग्णांमध्ये 161 पुरूष, 110 महिला आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 5037 रुग्ण आढळले आहेत, तर 247 जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
आज सायंकाळनंतर औरंगाबाद मनपा हद्दीतील 29, ग्रामीण भागातील 01 कोरोनाबाधित आढळले आहेत. या रुग्णांमध्ये 17 पुरूष आणि 13 महिला आहेत. यामध्ये रामकृष्ण नगर (3), टाऊन सेंटर (1), विद्या नगर (1), एन दोन सिडको (1), शिवाजी नगर (1), एन तीन सिडको (1), तानाजी नगर (1), इंदिरा मार्केट, एन सात, सिडको (1), पहाडसिंगपुरा, अमोदी हिल (1), राम नगर, एन दोन सिडको (1), यशश्री कॉलनी,एन आठ सिडको (1), उत्तम नगर, जवाहर कॉलनी (1), इटखेडा (1), शाह बाजार (3),रवींद्र नगर (1), पवन गणेश मंदिरामागे, नारळीबाग (1), विद्यापीठ गेट (1), ठक्कर नगर (1), विशाल नगर (1), रहिम नगर (1), मसोबा नगर, हर्सुल (1), यादव नगर, हडको (1), रेणुका माता मंदिर, बीड बायपास (1), एन चार, सिडको (1) अन्य (1) आणि ग्रामीण भागातील वडगाव, बजाज नगर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
आज 110 जणांना सुटी
एकूण 110 कोरोनाबाधित रुग्णांना आज सुटी देण्यात आलेली आहे. या रुग्णांमध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत 68, उर्वरीत 42 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.
एकूण आतापर्यंत 247 जणांचा मृत्यू
घाटीमध्ये आतापर्यंत एकूण 190 कोरोनाबाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यापैकी 186 कोरोनाबाधित औरंगाबाद जिल्ह्यात वास्तव्यास होते. त्यामुळे घाटीत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील 186, औरंगाबाद शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 60, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 247 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.