AurangabadUpdate : थर्माकॉल कंपनी बंद करण्याच्या मागणीसाठी पालकमंत्र्यांच्या गाडीसमोर महिलेची उडी ….

शेंद्रा डीएमआयसी मध्ये सुरू असलेल्या थर्माकोल कंपनीमुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप करीत एका महिलेने आज पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या गाडीसमोर चक्क आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडलेल्या या घटनेने एकच गोंधळ उडाला. आम्रपाली हिवाळे असे या महिलेचे नाव आहे. शेंद्रा डीएमआयसी मध्ये असलेल्या एका थर्माकोल कंपनीमुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप करीत आम्रपाली हिवाळे ही महिला थेट पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या गाडी समोर जाऊन झोपली. अचानक घडलेल्या या प्रकाराने एकच गोंधळ उडाला. अखेर पोलिसांनी सदर महिलेचा ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.