Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली पालकांची लूट , शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयातच “नो स्कूल, नो फी” आंदोलन….

Spread the love

राज्यातील शाळा नक्की केंव्हा सुरु होणार याबाबत शासनाकडून कुठलेही निर्देश नसताना पुण्यात खासगी शाळांनी ऑनलाईन क्लासेसच्या आडून पालकांकडे फीसाठी तगादा लावला आहे. आज अखेर पालकांनी शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयातच नो स्कूल नो फी हे आंदोलन सुरू केलंय. कोरोनाच्या महामारीमुळे पुण्यात तुर्तास शाळा बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश आहेत. तरीही काही खासगी शाळा ऑनलाईन क्लासेससाठी पालकांना सक्ती करत आहेत. त्या आडून अव्वाच्या सव्वा शिक्षण शुल्क देखील आकारू लागल्या आहेत त्याविरोधात हे आंदोलन केलं जात आहे. त्याविरोधात आज पुण्यातील पालक संघाने निषेधाचं आंदोलन केलं. पुण्यात खासगी शाळांची संख्या चारशेपेक्षा अधिक आहे. म्हणूनच लॉकडाऊनमुळे कंबरडं मोडलेल्या पालकांनी शाळा सुरू झालेल्या नसतानाही फी का भरायची असा सवाल आंदोलक पालकांनी उपस्थित केला आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून व्यवसाय बंद आहेत. छोटे मोठे व्यवसाय बंद पडले आहेत. कारखाने बंद असल्याने नोकरदारांना पगार नाही. जे पगारदार आहेत त्यांचीही वेतन कपात केली गेली. त्यामुळे लोकांजवळ पैसे नाहीत. त्यामुळे शाळांनी फीसाठी तगादा लावू नये असं पालकांचं म्हणणं आहे. किमान ऑगस्ट महिन्यापर्यंत तरी शाळा सुरू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ऑनलाईन माध्यमातून मुलांचा अभ्यास घेतला जात आहे. अशा परिस्थितीत शाळा प्रशासनाने फीमध्ये सुट द्यावी. किंवा काही महिने तरी सक्ती करू नये असं पालकांचं म्हणणं आहे. तर शिक्षकांना वेतन द्यावं लागतं आणि इतर सर्व गोष्टींना पैसै द्यावे लागतात. त्यामुळे शाळांचा कारभार चालवायचा तरी कसा असा प्रश्न संस्थाचालकांनी केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!