AurangabadCrimeUpdate : क्वारंटाईन कक्षातून फरार कैद्यांपैकी एकाला दिल्लीगेटवर पकडले

औरंगाबाद -किलेअर्क परिसरात क्वारंटाईन करुन ठेवलेल्या कोरोना पाॅझिटिव्ह कैद्यांमधून शनिवारी रात्री पावणेअकरा वा. पहिल्या मजल्यावरील दोन कैदी खिडक्यांचे गज वाकवून बेडशीटची दोरी करुन पळाले.या पैकी एका कैद्याला प्रकरणी एकाला सिटीचौक पोलिसांनी सकाळी ११.३०वा. पकडले.अशी माहिती पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
सैय्यद सैफ सैय्यद असफ असे पकडलेल्या कैद्याचे नाव आहे. याच्यावर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे.बनावट नोटा प्रकरणातील तो एक महत्वाचा आरोपी आहे.
आज सकाळी ११च्या सुमारास शेख सय्यद शेख समीर दिल्लीगेट परिसरात फिरत असतांना सिटीचौक पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचार्याने त्याला पाहिले.व दुरुन खुणेनेच समोरच्याला त्याला गप्पामधे रंगवण्यास सांगितले.तो पर्यंत अॅंबुलंस दिल्लीगेट परिसरात आली व शेख सय्यद ला ताब्यात घेत हर्सूल मध्यवर्ती कारागृहाच्या हवाली केले.अशी माहिती पोलिस निरीक्षक पवार यांनी दिली.