AurangabadNewsUpdate : कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दोन कैद्यांनी अलगीकरण कक्षातून ठोकली धूम….

औरंगाबाद – किलेअर्क परिसरात क्वारंटाईन करुन ठेवलेल्या कोरोना पाॅझिटिव्ह कैद्यांमधून शनिवारी रात्री पावणेअकरा वा. पहिल्या मजल्यावरील दोन कैदी खिडक्यांचे गज वाकवून बेडशीटची दोरी करुन पळाले.या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात हर्सूल तुरुंगाधिकार्याच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.
दोन कैद्यांपैकी एक छावणी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे तर दुसरा पुंडलिकनगर पोलिस ठाण्यातील फसवणूकीच्या गुन्ह्यातील आहे.
किलेअर्क परिसरात हर्सूल कारागृहातील तुरुंग अधिकारी कैलास काळे यांची क्वारंटाईन सेंटर मधे ड्यूटी होती. त्यांच्या सोबंत प्रशांत देवकर, प्रमोद शिंदै, सुधिर दिवे, प्रदीप चौधरी,नरसिंग बुगड, राजेंद्र भांबरे असे सहा कर्मचारी कर्तव्य बजावत होते.पहिल्या मजल्यावर प्रशांत देवकर यांची ड्यूटी सुरु असतांना ते लघुशंकेसाठी गेले तेंव्हाच दोन कैदी खिडक्यांचे गज वाकवून पळून गेल्याची माहिती मनपा कर्मचारी नाडे यांनी तुरुंगाधिकारी काळे यांना दिली. काळे यांनी सहकार्यासोबंत पाठलाग करंत दिल्लीगेट पर्यंत कैद्याचा माग काढला त्या ठिकाणी दोन्हीही कैदी लपून बसलेले त्यांना दिसले पण तुरुंगाधिकारी आणि कर्मचार्याला पाहताच दोन्ही कैद्यांनी धूम ठोकली. तुरुंगाधिकारी काळे या प्रकाराची माहिती वरिष्ठांना दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप करीत आहेत.