AurangabadCoronaUpdate : औरंगाबाद कोरोनाग्रस्तांची संख्या 2020 , जिल्ह्यात 737 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारी सहा कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2020 झाली आहे. यापैकी 1184 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 99 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 737 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. भीम नगर , भावसिंगपुरा (1), संजय नगर (1), रेहमानिया कॉलनी (1), तारांगण, पडेगाव (1), अमोदी हिल, पहाडसिंगपुरा (1), घाटी परिसर (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये चार महिला आणि दोन पुरुष रुग्णांचा समावेश आहे.