Aurangabad Corona Update : जिल्ह्यात १२४१ कोरोनाबाधित, आज २३ रुग्णांची वाढ, ४५ जणांचा मृत्यू

औरंगाबादमध्ये २३ करोनाबाधित सापडल्याने येथील रुग्णांची संख्या १२४१ वर पोहोचली आहे. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत ४५ करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ५८१ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
औरंगाबादमध्ये आज सापडलेल्या नव्या करोनाबाधितांमध्ये सादाफ नगर येथील (१), रेहमानिया कॉलनी (१), महेमूदपुरा (१), औरंगपुरा (१), एन-८ (१), एन-४, गणेश नगर (१), ठाकरे नगर, एन-२ (२), न्याय नगर (३), बायजीपुरा (१), पुंडलिक नगर (२), बजरंग चौक, एन-७ (३), एमजीएम परिसर (१), एन-५ सिडको (१), एन १२, हडको (१) पहाडसिंगपुरा (१), भवानी नगर (१) आणि गंगापूर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी (१) या भागातील रहिवाशांचा समावेश आहे. या २३ रुग्णांमध्ये ६ महिला आणि १७ पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान, आज नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १२४१ झाली आहे.