#AurangabadCoronaUpdate : ताजी बातमी : जिल्ह्यात 1173 कोरोनाबाधित, आज 54 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यात आज 54 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1173 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. औरंगाबाद शहरातील गरम पाणी (1), शिवराज कॉलनी (1), कैलास नगर (1), सौदा कॉलनी (1), रेहमानिया कॉलनी (२), आझम कॉलनी, रोशन गेट (2), सिटी चौक (6), मकसूद कॉलनी (1), हडको एन-12 (1), जयभीम नगर (11), हुसेन कॉलनी, गल्ली नं.9 (1), खडकेश्वर (1), न्याय नगर, गल्ली न.18 (2), हर्सुल कारागृह (1), खिवंसरा पार्क,उल्कानगरी (2), टाइम्स कॉलनी, कटकट गेट (2), मुकुंदवाडी (5), आदर्श कॉलनी (1), काबरा नगर (1), उस्मानपुरा (3), हुसेन कॉलनी, गल्ली नं.10 (4) आणि पडेगाव येथील मीरा नगर (4) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 28 महिला व 26 पुरुषांचा समावेश आहे.