Auranagabad Update : रमजान ईद शांततेने घरीच साजरी करा, धर्मगुरूंच्या बैठकीत खा. इम्तियाज जलील यांचे आवाहन

औरंंंगाबाद : मुस्लिम समाजबांधवांचा रमजान महिना सध्या सुरू असून येत्या २५ मे रोजी रमजान ईद साजरी केली जाणार आहे. मुस्लिम समाज बांधवांनी ईद शांततेने आणि घरीच साजरी करावी असे आवाहन खासदार सय्यद इम्तियाज जलील गुरूवारी (दि.२१) पोलिस आयुक्तालयात मुस्लिम धर्मगुरूसोंबत झालेल्या बैठकीत केले आहे. बैठकीनंतर पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी छावणी ईदगाह मैदानाची पाहणी केली.
पोलिस आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या धर्मगुरूसोबच्या बैठकीला खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्यासोबत पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त मिना मकवाना, निकेश खाटमोडे पाटील, डॉ. राहुल खाडे, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, माजी महापौर रशीद मामू, राष्ट्रवादी काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते कदीर मौलाना, मौलाना मदनी, मौलाना गयासुद्दीन सिद्दीक्की आदीसह शहरातील मुस्लिम समाजाचे प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते. यावेळी रमजान ईद संदर्भात चर्चा करण्यात आली. सर्वानुमते येत्या २५ तारखेला रमजान ईद सार्वजनिक ठिकाणी साजरी न करता आप-आपल्या घरातच साजरी करण्याचे ठरविण्यात आले. तसेच रस्त्यावर कोणीही गर्दी न करता सोशल डिस्टेंन्स पाळून ईद साजरी करण्याचे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी यावेळी केले.
दरम्यान, कोरोना विषाणूची महामारी सुरू असल्यामुळे सर्व नागरीकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केले. तसेच ईदच्या दिवशी शहराच्या विविध भागात योग्य बंदोबस्त ठेवला जाणार असल्याचे देखील त्यांनी यावे