#CoronaVirusUpdate : धक्कादायक : ३० रुग्णांची वाढ , एकूण रुग्णसंख्या ८७२, तर २५ मृत्यू , आजार न लपवण्याचा मनपा प्रशासकांचे आवाहन…

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात आज 30 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 872 झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबाद शहरातील आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. एमजीएम मेडिकल कॉलेज (3), हनुमान चौक, चिकलठाणा (1), राम नगर (3), एमआयडीसी (1), जालान नगर (1), संजय नगर, लेन नं.6 (3), सादात नगर (4), किराडपुरा (1), बजाज नगर (1), जिनसी रामनासपुरा (1), जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं. पाच (1), जहागीरदार कॉलनी (1), आदर्श कॉलनी (1), रोशन गेट (1)
अन्य (7) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 17 पुरुष आणि 13 महिला रुग्णांचा समावेश आहे.
घाटी रुग्णालयात मागील चोवीस तासात औरंगाबाद शहरातील नवीन हनुमान नगर येथील 74 वर्षीय, बायजीपुरा येथील 70 वर्षीय, शहानूर मियाँ येथील 57 वर्षीय आणि हिमायत नगर येथील 40 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत 25 कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले असल्याचेही त्यांनी कळविले आहे.
काल दिवसभरात जिल्हाधिकारी….
काल दिवसभरात औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कापूस पूर्णक्षमतेने मे अखेरपर्यंत खरेदी करण्यासाठी , राज्य कापूस पणन महासंघ , भारतीय कापूस निगम लिमिटेड आणि जिनिंग प्रेसिंग च्या प्रोप्रायटर आणि व्यवस्थापकांसोबत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बैठक घेऊन योग्य ते निर्देश दिले. याशिवाय जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज शहरातील राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयाला भेट दिली शंभर खाटांच्या या रुग्णालयात हेल्थ सेंटर सुरू करण्याच्या दृष्टीने घाटी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पथकासह पाहणी केली.
आस्तिककुमार पांडे यांचे फेसबुक लाईव्ह….
दरम्यान मनपा आयुक्त तथा प्रशासक असती कुमार पांडे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शहरातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली व याबाबत करण्यात येत असलेल्या उपाय योजने बद्दल नागरिकांना माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने यावेळी त्यांनी सांगितले की शहरात सक्रिय पॉझिटिव पेशंटची संख्या 492 असून एकूण संख्या पाहता 221 पेशंट बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. तसेच 21 मे पर्यंत जवळपास 200 एक पेशंट बरे होऊन आपल्या घरी जातील याप्रमाणे एकूण 422 पेशंट बरे होऊन आपल्या घरी गेलेले असतील. याशिवाय महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजने अंतर्गत येणाऱ्या रुग्णांवर एमजीएम रुग्णालय येथे यापुढे उपचार केले जातील. लवकरच एमआयडीसी अंतर्गत मेल्ट्रॉन कंपनीची बिल्डिंग ही स्पेशल कोविड रुग्णालयांमध्ये परावर्तित होणार आहे . त्यात 250 बीडची व्यवस्था असणार आहे. कदाचित आपल्याला कोरोना संसर्ग झाल्यास कोणीही घाबरून जाऊ नका कारण की 80% पेशंट त्यातून बरे झाले आहेत.
कोरोना संसर्गाची लागण ही तरुण पिढी कडून जास्त प्रमाणात होत आहे त्यामुळे त्यांच्यावर आपल्या घरातील वयोवृद्ध यांची सुरक्षिततेची जबाबदारी आहे त्याकरता त्यांनी लोक भाऊंच्या काळात लोक भाऊंचे काटेकोरपणाने पालन करावे. कोणीही आता अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर जाऊ नका आणि गेलात तर मास्क आणि सानेटायझर सोबत ठेवा.
पोलीस कारवाई
दरम्यान झालटा फाटा येथे परराज्यातून अवैधरीत्या गुटख्याची तस्करी करणाऱ्या टोळीकडून औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी एक कोटीचा मुद्देमाल सापळा लावून जप्त केला आहे. याशिवाय कर्फ्यूचे उल्लंघन करण्याबाबतच्या २० गुन्ह्यात पोलसांनी एकूण 577 गुन्हे दाखल केले तर रस्त्यावर आलेली एकूण ३३५ वाहने जप्त करण्यात आली .