#AurangabadCoronaUpdate : औरंगाबाद शहरात आणखी 56 रुग्णांची धक्कादायक वाढ, जिल्ह्यात 743 कोरोनाबाधित, मृत्यूंची संख्या 20

औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील एका रुग्णाचा कोविड पॉझिटिव्ह अहवाल काल (दि.13 मे) रात्री प्राप्त झाला. हा रुग्ण घाटीमध्ये उपचार घेत असल्याने कालपर्यंत जिल्ह्यात एकूण 688 कोरोनाबाधित आढळलेले आहेत. त्यामध्ये आज सकाळी 55 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 743 झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
यामध्ये औरंगाबाद शहरातील रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. औरंगाबाद शहरातील भीमनगर (15), पडेगाव (01), उस्मानपुरा (07), सिल्क मिल कॉलनी (01), कांचनवाडी (01), नारळीबाग (01), आरटीओ (02), गरम पाणी (01), बन्सीलाल नगर (01), सातारा (08), हुसेन कॉलनी (02), दत्त नगर (01), न्याय नगर (02), पुंडलिक नगर (01), संजय नगर – मुकुंदवाडी (03), गुरू नगर (01), नंदनवन कॉलनी (01), गारखेडा (01), शहनुरवाडी (01), पंचशील दरवाजा (01), बेगमपुरा (01), अन्य (02) या परिसरातील आहेत, असेही कळवले आहे.
हुसेन कॉलनीतील कोविडबाधित महिलेचा मृत्यू
गारखेडा परिसरातील हुसेन कॉलनी येथील 55 वर्षीय कोविडबाधित महिलेचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला असल्याचे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.
या महिलेस 12 मे रोजी खासगी रुग्णालयातून घाटीच्या अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले होते. मधुमेह, उच्च रक्तदाब व हायपोथायरॉयडिझमचा त्यांना त्रास होता. 12 मे रोजी त्यांचा कोविड पॉझिटिव्ह अहवाल आल्याने त्यांच्यावर कोविड आजाराचे उपचार सुरू होते. परंतु आज पहाटे पाच वाजून 20 मिनिटांनी त्यांचा न्यूमोनिआ, कोविड आजाराने उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मृत्यूसह एकूण 20 कोविडबाधितांचे मृत्यू झाले असल्याचे डॉ. येळीकर व माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.