AurangabadCoronaUpdate : पुन्हा चार रुग्णांची वाढ, जिल्ह्यात 747 कोरोनाबाधित

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 55 रुग्णांची वाढ झाली. तर दुपारी चार रुग्णांची परत भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 747 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
यामध्ये औरंगाबाद शहरातील रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. औरंगाबादेतील आलोक नगर, सातारा परिसर (01), पुंडलिक नगर (01), संजय नगर (01) बजाज नगर (वाळूज) (01) या परिसरातील आहेत. यामध्ये तीन पुरुष आणि एका महिला रुग्णाचा समावेश असल्याचेही कळवले आहे.