#CoronaVirusUpdates : आज दिवसभरात : औरंगाबाद जिल्ह्यात 620 कोविडबाधित, चार जणांना सुटी, दोघांचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागातील 62 कोविडबाधित रुग्णांची वाढ झाल्याने कोविड बधितांची संख्या 620 झाली आहे. तर नूर कॉलनी आणि मुकुंदवाडीतील संजय नगर येथील प्रत्येकी दोन अशा एकूण चार कोविडबाधितांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना आज सुटी देण्यात आली. आतापर्यंत एकूण 77 जणांना सुटी देण्यात आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.
रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) न्याय नगर (02), संजय नगर (01), एसआरपीएफ, सातारा परिसर (01), कोतवाल पुरा (01), एन-4 सिडको (01), सदानंद नगर, सातारा परिसर (08), बीड बायपास रोड (01), भवानी नगर, जुना मोंढा (03), पुंडलिक नगर, गल्ली क्रमांक सहा (01), दत्त नगर-कैलास नगर, लेन क्रमांक पाच (05), कैलास नगर (01), बायजीपुरा (01), राम नगर (22), किल्ले अर्क (08) आणि ग्रामीण भागातील सातारा गाव (01), गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा (05) हा परिसर आहे. या रुग्णांमध्ये 36 पुरूष आणि 26 महिलांचा समावेश आहे.
पाच जणांचे लाळेचे नमुने आज घेऊन प्रयोगशाळेस पाठविण्यात आले आहेत. 47 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. विलगीकरण कक्षात 87 कोविडबाधितांवर उपचार सुरू आहेत. आज घाटीमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने आजपर्यंत 15 कोविडबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचेही मिनी घाटी प्रशासनाने सांगितले.
घाटीमध्ये 46 कोविडबाधितांवर उपचार
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील घाटीच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल (डीसीएच) 46 कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी 42 रुग्णांची स्थिती सामान्य आहे. चार रुग्णांची स्थिती गंभीर आहे, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.
सिल्क मिल कॉलनीतील 34 आणि 36 वर्षीय कोविड पॉझिटिव्ह महिलांना आरोग्य व कुटुंब कल्याण सेक्टर येथून घाटीत काल (दि. 10 मे रोजी) संध्याकाळी संदर्भीत करण्यात आलेले आहे. कैलास नगरातील लेन क्रमांक चार मधील 55 वर्षीय, बायजीपुऱ्यातील 75 वर्षीय, उस्मानपुऱ्यातील पीर बाजार येथील 55 वर्षीय्, समता नगरातील 45 वर्षीय असलेल्या पुरूष रुग्णांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. सध्या घाटीत 43 कोविड निगेटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 13 कोविड निगेटीव्ह रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
घाटीत आज दुपारी चार वाजेपर्यंत एकूण 61 रुग्णांची स्क्रीनिंग झाली. त्यापैकी 19 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. दोन रुग्णांचा अहवाल कोविड निगेटिव्ह आलेला आहे. 17 जणांचा अहवाल येणे बाकी आहे. घाटी येथे एकूण 106 रुग्ण भरती आहेत, असे डॉ. येळीकर आणि माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले आहे.
रामनगर, पुंडलिक नगरातील कोविड बाधितांचा मृत्यू
पुंडलिक नगरातील 58 वर्षीय पुरूष रुग्णास मिनी घाटीतून घाटीमध्ये 9 मे रोजी संदर्भीत करण्यात आले होते. त्यांचा अहवाल याच दिवशी कोविड पॉझिटिव्ह आलेला होता. संदर्भीत केल्यानंतर त्यांना तत्काळ घाटीच्या अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले. क्षयरोगामुळे फुफुसाचा एक भाग शस्त्रक्रिया करून काढण्यात आलेला होता. तसेच मेंदुचा क्षयरोग, मानसिक व झटक्याचा आजारही त्यांना होता. दोन्ही फुफुसांच्या न्युमोनिआमुळे त्यांच्या शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण 64 टक्के कमी झाले होते. म्हणून त्यांना कृत्रिम श्वासोश्वास देण्यात आला होता. परंतु 11 मे रोजी त्यांना सायं.4.30 वाजता तीव्र झटका आल्याने व कोविड आजारासह इतर आजार असल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तर राम नगरातील 80 वर्षीय कोविड पुरुष रुग्णाचाही आजच मृत्यू झाला. ताप, खोकला आणि दम लागत असल्याने त्यांना 8 मे रोजी दुपारी घाटी रुग्णालयात भरती केले होते. त्यांचा 9 मे रोजी कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर 8 मेपासूनच कोविडसाठी अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. जास्त दम लागत असल्याने व शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याने त्यांना 10 मेपासून व्हेंटिलेटरवर ठेवले होते. परंतु त्यांचे वय जास्त आणि न्युमोनिआ, श्वसनाचेही विकार होते. परंतु त्यांचाही उपचारादरम्यानच आज 11 मे रोजी मध्यरात्री 1.10 मिनिटांनी मृत्यू झाला, असेही डॉ. गायकवाड यांनी सांगितले आहे.