AurangabadCoronaVirusUpdate: सकाळपासून ६१ रुग्णांची वाढ , दुपारपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या ६१९ वर तर बळींची संख्या १४

Update 1.30
औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागातील 61 कोविडबाधित रुग्णांची सकाळपासून वाढ झाल्याने आतापर्यंत 619 कोविडबाधित रुग्ण आढळलेले आहेत, तर एकूण बळींची संख्या १४ झाली असल्याचे असे मिनी घाटी प्रशासनाने सांगितले.
औरंगाबाद शहरातील (कंसात रुग्ण संख्या) न्याय नगर (02), संजय नगर (01), एसआरपीएफ, सातारा परिसर (01), कोतवाल पुरा (01), एन-4 सिडको (01), सदानंद नगर, सातारा परिसर (08), बीड बायपास रोड (01), भवानी नगर, जुना मोंढा (03), पुंडलिक नगर, गल्ली क्र. सहा (01), दत्त नगर-कैलास नगर, लेन क्रमांक पाच (05), कैलास नगर (01), बायजीपुरा (01), राम नगर (22), किल्ले अर्क (08) आणि ग्रामीण भागातील सातारा गाव (01), गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा (04) हा रुग्णांचा परिसर आहे. रुग्णांमध्ये 36 पुरूष आणि 25 महिलांचा समावेश असल्याचेही कळविले आहे.
**