Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : Maharashtra : कोरोनातून मुक्त होऊन जितेंद्र आव्हाड सुखरूप घरी पोहोचले , मानले डॉक्टरांसहित सर्वांचे आभार….

Spread the love

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. आपण  ठणठणीत बरे होऊन घरी परतलो असून आपल्यावर यशस्वी उपचार करणाऱ्या फोर्टिस रुग्णालयाच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. पुरोगामी महाराष्ट्रासाठी लढण्यास पुन्हा त्याच जोमानं सज्ज होऊया, असं आवाहनही  त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. आव्हाड यांनी स्वत: ट्विट करून बरे झाल्याची माहिती दिली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी पुढील एक महिना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला आहे. त्यामुळं कुणीही भेटायला येऊ नये. महिनाभराच्या विश्रांतीनंतर मी आपल्या सोबत असेन,’ असं त्यांनी म्हटलं आहे. आव्हाड यांनी एकामागोमाग एक अनेक ट्विट केले आहेत.

दरम्यान आजारपणाच्या काळात आधार दिल्याबद्दल पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, जयंत पाटील, राजेश टोपे अशा सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहू द्या, अशी भावना आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. ‘माझ्यावर यशस्वी उपचार करणारे फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय आणि इतर सर्वांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन, असं त्यांनी म्हटलं आहे. सोबतच एक हिंदी कविताही त्यांनी ट्विट केली आहे. कोव्हिड पॉझिटिव्ह पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळं आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी स्वत:ला होम क्वारंटाइन केले होते. त्यानंतर त्यांची करोना चाचणी करण्यात आली. त्यात पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांना मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. आव्हाड यांच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी देखील करोनावर मात केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!