AurangabadNewsUpdate : ९० वर्षीय ज्येष्ठ नागरिक बेपत्ता

औरंगाबाद। नेलनुथाला विठोबा राव हे ९० वर्षीय ज्येष्ठ ८ मे (शुक्रवार) रोजी संध्याकाळी उल्कानगरी, येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नित्यनियमाप्रमाणे गेले होते. सदर मंदिर घरासमोरच असल्याने राव दररोज मंदिरात दर्शनासाठी जातात,मात्र बराच वेळ झाल्यावरही ते परत आले नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला असता ते कोठेही आढळनू आले नाही. दरम्यान याविषयी नातेवाईकांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली आहे. नेलनुथाला विठोबा राव ९० वर्षीय असून चेहरा गोल, रंग सावळा आहे. उंची ५ फुट ५ इंच आहे. डोक्यावर केस नाही. पांढरी दाढी आहे. त्यांना तेलगु व इंग्रजी भाषा येते. त्यांनी पांढरा शर्ट व पांढरी लुंगी घातलेली आहे. सदर वर्णन असलेली व्यक्ती कुणाला आढळून आल्यास 9881233754 क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.