Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : महाराष्ट्रात येत्या काळात रुग्णांची संख्या आणखी वाडजण्याची शक्यता : राजेश टोपे

Spread the love

कोरोनाच्या पार्शवभूमीवर राज्यात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. येत्या काळात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे योग्य त्या समन्वयाच्या दृष्टीने व नागरिकांच्या सोयीसाठी एक खिडकी योजना तयार करून सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून द्यावात, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या. पुणे विभागातील पुणे शहराबरोबरच सातारा व सोलापूर जिल्ह्यांत करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर करोनाच्या अनुशंगाने प्रशासनाच्यावतीने सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत ससून रुग्णालयात आज आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी टोपे बोलत होते.

पुणे विभागीय आढावा बैठकीत विभागातील तसेच पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार करून मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदांची भरती तातडीने करावी, कारोनाबाधित रुग्णांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्यावात. तसेच करोनाबाधित नसलेल्या रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये, करोनाबाधित रुग्णांना उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस तसेच वार्डमधील सफाई कामगार यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्यावात, विलगीकरण कक्षातील नागरिकाला जेवण, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच शौचालय आणि परिसरातील स्वच्छता याकडे विशेष लक्ष द्यावे. भविष्यात करोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेवूनच जास्तीत बेडची सुविधा निर्माण करावी, अशा सूचना आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी दिल्या.

दरम्यान  विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आरोग्यमंत्री टोपे यांना आढावा बैठकीत विभागातील करोना परिस्थितीच्या अनुशंगाने सुरू असलेल्या तयारीबाबत माहिती दिली. पुणे महानगरपालिका क्षेत्रात करीत असलेल्या उपाययोजनाच्या संदर्भात पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी तसेच पुणे जिल्ह्याच्या बाबतीत जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी माहिती दिली. आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी ताजा तपशील दिला. ससून रुग्णालयाच्या सोयीसुविधा तसेच पदाबाबतची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!