AurangabadNewsUpdate : एचडीएफसी बँकेला आग लागून लाखो रूपयांचे नुकसान, टीव्ही सेंटर परिसरातील घटना

औरंंंगाबाद : एचडीएफसी बँकेला शॉर्टसर्कीटने लाग लागून लाखो रूपयांचे नुकसान झाले. बँकेला आग लागल्याची घटना गुरूवारी (दि.३०) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास टीव्ही सेंटर परिसरातील कीर्ती मंगल कार्यालयाजवळ घडली. अग्निशमन दलाच्या कर्मचायांनी वेळीच धाव घेतल्याने मोठे नुकसान टळले असल्याची माहिती सिडको अग्निशमन दलाच्या सुत्रांनी दिली.
टीव्ही सेंटर परिसरातील कीर्ती मंगल कार्यालयाजवळ एचडीएफसी बँकेची शाखा आहे. गुरूवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अचानकपणे शॉर्टसर्कीट होवून आग लागली. आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण करीत बँकेला आपल्या कावेत घेतले होते. बँकेला लाग लागल्याची माहिती परिसरातील नागरीकांनी पोलिसांना व अग्निशमन दलाला दिली. बँकेला आग लागल्याची माहिती मिळताच सिडको अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली.
सिडको अग्निशमन दलाचे विजयसिंग राठोड यांच्यासह अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेवून तब्बल तासाभरानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. बँकेला लागलेल्या आगीत वातानूकुलीत यंत्रणा, फर्निचर आणि कागदपत्रे जळून खाक झाली. बँकेला लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले. या घटनेची नोंद सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.