#Aurangabad NewsUpdate : कोरोना संशयीत महिलेने ठोकली जिल्हा रूग्णालयातून धूम…पण पुन्हा पकडून आणण्यात प्रशासनाला यश !!

औरंंंगाबाद : कोरोनाची लागण झाल्याच्या संशयावरून जिल्हा समान्य रूग्णालयात (मिनी घाटी) उपचारासाठी दाखल केलेल्या ६५ वर्षीय महिलेने डॉक्टर आणि सुरक्षारक्षकांची नजर चुकवून रूग्णालयातून धुम ठोकली होती. हा प्रकार लक्षात आल्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात एकच खळबळ उडाली होती. जिल्हा सामान्य रूग्णालयातून धुम ठोकलेल्या ६५ वर्षीय महिलेला पुन्हा पकडून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या समतानगरातील एका रूग्णाच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून समतानगरात राहणा-या ६५ वर्षीय वृध्द महिलेला जिल्हा सामान्य रूग्णालयात अलगीकरण कक्षात (क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या ६५ वर्षीय वृध्द महिलेने जिल्हा सामान्य रूग्णालयातील डॉक्टर आणि सुरक्षारक्षकांची नजर चुकवून धुम ठोकली होती. हा प्रकार लक्षात आल्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या कर्मचा-यांनी पळून गेलेल्या महिलेचा शोध घेवून तिला पुन्हा रूग्णालयात आणून दाखल केले.
याप्रकरणी जिल्हा सामान्य रूग्णालयाचे सुरक्षारक्षक विश्वनाथ गवई (वय ३०, रा.गजानन नगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून रूग्णालयातून धुम ठोकणा-या महिलेविरूध्द एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना माहिती का दिले असे म्हणत टोळक्याने केली रिक्षाचालकास मारहाण
औरंंंगाबाद : आम्ही गांजा विक्रीचा व्यवसाय करतो अशी माहिती पोलिसांना का दिली असे म्हणत पाच ते सहा जणांच्या टोळक्याने मिर्झा अजमत बेग मिर्झा ईनायत बेग (वय ४७, रा.रोशनगेट, शरिफ कॉलनी) या रिक्षाचालकास शिवीगाळ करून चावूâने मारहाण केली. ही घटना २७ एप्रिल रोजी पावणेपाच वाजेच्या सुमारास जिन्सी परिसरातील शरीफ कॉलनी येथे घडली. याप्रकरणी सैय्यद जाबेर (वय ३५, रा.बाबर कॉलनी), राजा खान जहांगीर खान (वय ३२), पारेख खान जहांगीर खान (वय २६), अय्या खान जहांगीर खान (वय ४०), आमेर खान जहांगीर खान (वय २८), अफताब खान (वय १८), सर्व राहणार शरीफ कॉलनी यांच्याविरूध्द जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार सुपेकर करीत आहेत.
दिरानेच काढली भावजयीची छेड, गुन्हा दाखल
आपल्या पत्नीसोबत वाद घालणा-या भावजयीची छेड काढुन दिराने तिचा विनयभंग केला. ही घटना २२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सिडको परिसरात घडली. बंटी प्रल्हाद सोनवणे (वय ३५, रा.सिडको) याची पत्नी घरात घरात खोकलत होती. त्यावेळी पिडीत २५ वर्षीय महिलेने तिला घरात खोकलू नका असे सांगितले असता बंटी सोनवणे याच्या पत्नीने पीडितेसोबत वाद घातला. यावेळी बंटी सोनवणे याने पीडितेच्या अंगावरील कपडे फाडून तिच्याशी शारीरिक लगट करीत विनयभंग केला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जमादार पुâके करीत आहेत.