#CoronaVirusEffect : कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मण महासंघाने घरातच साजरी केली परशुराम जयंती

कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने आज परशुराम जयंती घरीच साजरी करण्यात आली. त्या वेळी आज अभिषेक व जन्म सोहळा नंतर आरती करण्यात आली. या निमित्ताने जिल्हाध्यक्ष सुधीर नाईक यांच्या तर्फे आयोजित त्याच्या घरात झालेल्या कार्यक्रमात आयोजित वेद शास्त्र सम्पन्न जयंत ढ़ोंगड़े गुरुजी महेश पुजारी ह्यांनी अभिषेक मंत्र पठण केला तर या प्रसंगी मिलिंदजी व शंतनु चौधरी आदी उपस्थित होते.
दरम्यान अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा तर्फे ज्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्याला औरंगाबादसह जळगाव , रत्नागिरी, कुडाल, पुणे, बुलढाणा, जालना, धुले, अहमदनगर, परभणी आदि जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. चित्रकला स्पर्धेत एकूण २१२, निबंध स्पर्धेत एकूण १०९ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. या निमित्ताने भगवान परशुराम जप , डॉक्टरांना प्रश्न विचारणे आदी विविध उपक्रम राबविण्यात आले.