#AurangabaD Crime : गावठी हातभट्टीची दारू तयार करणारे तिघे गजाआड, २ लाख १२ हजाराची गावठी दारू जप्त

औरंंंगाबाद : गावठी बनावटनाची हातभट्टीची दारू तयार करून विक्री करणा-या तिघांना पोलिसांनी रविवारी (दि.२६) गजाआड केले. तिघांच्या ताब्यातून पोलिसांनी २ लाख १२ हजार ५०० रूपये विंâमतीची ४२५ लिटर गावठी दारू जप्त केली आहे. ही कारवाई उस्मानपुरा परिसरातील मिलिंदनगर भागात करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मानपुरा परिसरातील रेल्वेपटरीजवळ असलेल्या मिलिंदनगर येथे अजय रमेश वाहुळ उर्फ ठाकूर (वय २५, रा.साईनगर, एकता कॉलनी), संतोषसिंग तारासिंग कल्याणी (वय २८), अरूण बाबूराव शिनगारे (वय २८), दोघे राहणार मिलिंदनगर, उस्मानपुरा हे गावठी बनावटीची हातभट्टीची दारू तयार करून विक्री करीत असल्याची माहिती उस्मानपुरा पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे डीबी पथकाचे सहाय्यक फौजदार कल्याण शेळके, जमादार प्रल्हाद ठोंबरे, सतीश जाधव, संतोष सिरसाट, संजयसिंग डोभाळ आदींच्या पथकाने मिलिंदनगरात छापा मारला. त्यावेळी अजय वाहुळ उर्फ ठाकूर , संतोषसिंग कल्याणी, अरूण शिनगारे हे तिघेही गावठी बनावटीची हातभट्टीची दारू विक्री करतांना मिळून आले. पोलिसांनी तिघांच्या ताब्यातून २ लाख १२ हजार ४२५ रूपये विंâमतीची ४२५ लिटर गावठी दारू जप्त केली आहे. गावठी दारू विक्री करणा-या तिघांंविरूध्द उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उस्मानपुरा विभागाचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोंखे, उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप तारे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे सहाय्यक फौजदार कल्याण शेळके यांच्या पथकाने केली.