Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirus #AurangabadUpdate : आज दिवसभरात ५ पॉझिटिव्ह , मराठवाड्यातील एकूण रुग्णांची संख्या ७३ तर ३४ डिस्चार्ज…

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये हिलाल कॉलनीतील एकाच कुटुंबातील तीन महिला रुग्णांची (वय 18, 26 आणि 31) तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) टाऊन हॉल परिसरातील 70 वर्षीय पुरुष आणि किलेअर्क मधील 60 वर्षीय महिला अशा एकूण पाच कोरोनाबाधित रुग्णांची आज भर पडली आहे.

Advertisements

सध्या मिनी घाटीत एकूण 18 कोरोनाबाधित रुग्णांवर, तर घाटीत चार अशा एकूण 22 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत, 22 जण बरे होऊन घरी गेलेत, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 49 कोरोनाबाधित रुग्ण औरंगाबादेत आढळले आहेत.
आज एकूण 88 रुग्णांची तपासणी करण्यात आली. 31 जणांना घरीच अलगिकरणात राहण्याचा सल्ला दिला. 65 जणांचे लाळेचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आहे. 110 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुटी देण्यात आल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.
घाटीत चार पॉझिटिव्ह रुग्ण
घाटीत मागील चोविस तासात दुपारी चार वाजेपर्यंत 21 रुग्णांची तपासणी झाली. त्यापैकी 11 जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर चार जणांचा अहवाल निगेटीव्ह आलेला आहे. पाच जणांचा अहवाल येणे बाकी आहे. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालात 60 वर्षीय महिला रुग्ण (रा. किलेअर्क), 70 वर्षीय पुरूष रुग्ण (रा. टाऊन हॉल परिसर) यांचा समावेश आहे. या रुग्णांसह सध्या घाटीच्या डेडिकेटेड कोविड रूग्णालयात समता नगरातील 38 आणि 51 वर्षीय कोविड पॉझिटिव्ह पुरूष अशा एकूण चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर घाटी रुग्णालयात एकूण 24 रुग्ण भरती आहेत.
मागील चोविस तासात घाटी रुग्णलयात दोन कोविड निगेटीव्ह रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर नऊ नॉन कोविड रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आलेली आहे, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर व माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळवले आहे.

Advertisements
Advertisements

औरंगाबाद विभागात 73 कोरोनाबाधित
34 रुग्णांना डिस्चार्ज : 5 जणांचा मृत्यु : 34 जणांवर उपचार

औरंगाबाद विभागांतर्गत आठ जिल्ह्यांमध्ये एकूण 73 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. त्‍यापैकी औरंगाबाद येथे 49 रुग्‍ण (5‍ रुग्‍णाचा मृत्‍यू झालेला आहे व 22 रुग्‍ण बरे झाल्‍यामुळे डिस्‍चार्ज देण्‍यात आले आहे), जालना-२, परभणी-१, हिंगोली-8 (एक रुग्‍ण हा बरा झाल्‍यामुळे त्‍यास डिस्‍चार्ज देण्‍यात आले आहे), नांदेड-१, लातूर-9 (8 रुग्‍णे बरे झाल्‍यामुळे त्‍यांना डिस्‍चार्ज देण्‍यात आले आहे) आणि उस्‍मानाबाद-३ (सर्व रुग्‍ण बरे झाल्‍यामुळे त्‍यांना डिस्‍चार्ज देण्‍यात आले आहे) रुग्‍णांचे निदान झाले आहे. आज रोजी औरंगाबाद विभागांतर्गत वस्‍तुतः 34 कोरोना बाधित रुग्‍णांवर उपचार चालू आहेत. (औरंगाबाद-22, जालना-2 व परभणी-1, हिंगोली-7 , नांदेड-1, लातुर-1, )

आपलं सरकार

Click to listen highlighted text!