Aurangabad Cyber Crime : भामट्याने महाविद्यालयीन तरूणीस गंडविले…

औरंंंगाबाद : बँकेतून बोलत असल्याची थाप मारून भामट्याने महाविद्यालयीन तरूणीच्या बँक खात्यातून ४४ हजार ५०८ रूपये लंपास केले. हा प्रकार ९ ते १९ मार्चदरम्यान घडला असून भामट्याविरूध्द सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्ञा यशवंत सिरोरे (वय २२, रा.मयुरनगर, हडको एन-११) या तरूणीच्या मोबाईलवर ९ मार्च रोजी भामट्याने संपर्क साधला होता. भामट्याने आपण अॅक्सीस बँकेतून बोलत असून गेल्या सहा महिन्यात तुम्ही क्रेडिट कार्डाचा वापर न केल्यामुळे कार्ड ब्लॉक होणार असल्याचे सांगितले. तसेच कार्ड ब्लॉक होऊ द्यायचे नसेल तर मोबाईलवर येणारा ओटीपी क्रमांक व क्रेडिट कार्डाचे डिटेल विचारून घेतले. त्यानंतर भामट्याने ९ ते १९ मार्चदरम्यान प्रज्ञा सिरोरे हीच्या बँक खात्यातून ४४ हजार ५०८ रूपये ऑनलाईनरित्या लंपास केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक प्रविण पाटील करीत आहेत.