Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : नैतिक गुंत्यात अडकू नका ,ताकाला जाऊन भांडे लपवू नका , राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र….

Spread the love

https://www.facebook.com/RajThackeray/posts/792889354575549

‘राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या बिकट आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. त्यामुळं महसुलाचा ओघ सुरू करण्याचा विचार आता सरकारनं करायला हवा. वाईन शॉप्स सुरू ठेवून त्याची तजवीज करता येऊ शकते. त्यामुळं कुठल्याही नैतिक गुंत्यात न अडकता राज्य सरकारनं तसा निर्णय घ्यावा,’ अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ‘दारू पिणाऱ्यांचा विचार करा असा माझ्या म्हणण्याचा उद्देश नाही, हेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केलं आहे.

लॉकडाऊनमुळं निर्माण झालेल्या आर्थिक कोंडीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी राज्य सरकारला पत्राद्वारे काही सूचना केल्या आहेत. त्यात त्यांनी दारूच्या उत्पादन व विक्रीच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलाकडं सरकारचं लक्ष वेधलं आहे. ‘राज्यातील पेट्रोलपंप आज जवळपास बंद आहेत. जमिनींचे आणि स्थावर मालमत्तांचे व्यवहार ठप्प आहेत. दारूवरच्या अबकारी शुल्कातून राज्याला दिवसाला ४१.६६ कोटी, महिन्याला १२५० कोटी आणि वर्षाला १५००० कोटी मिळतात. यावरून सरकारला होत असलेल्या व होऊ शकणाऱ्या महसुली तोट्याचा विचार व्हायला हवा. टाळेबंदी आणखी किती दिवस चालेल याची खात्री नाही. त्यामुळं राज्याच्या महसुलासाठी सरकारनं वाइन शॉप उघडण्याचा विचार करावा, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

‘या आधी राज्यात दारूबंदी होती आणि आता ती महसुलासाठी उठवा असं कोणी म्हणत नाही. टाळेबंदीच्या आधी दारूची दुकानं सुरूच होती. त्यामुळं कुठल्याही नैतिक गुंत्यात न अडकता राज्य सरकारने निर्णय घ्यावा. ‘ताकाला जाऊन भांडं लपवण्याची गरज नाही. राज्याला महसुलाची गरज आहे हे वास्तव स्वीकारलं पाहिजे. दुकानं सुरू झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग वगैरेचे निकष लावता येतीलच, असंही त्यांनी पत्रात पुढं म्हटलं आहे. याचबरोबर, मुंबईसारख्या शहरात गरज बनलेल्या हॉटेल, खानावळी व पोळी-भाजी केंद्रांना पार्सल सेवा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. ‘खानावळी व काही हॉटेलांमध्ये माफक दरात मिळणाऱ्या ‘राईसप्लेट्स’वर राज्यातील मोठी लोकसंख्या अवलंबून आहे. त्यांनाही यातून आधार मिळेल. हॉटेलातील कर्मचाऱ्यांचा रोजगार सुरू होईल व राज्याच्या अर्थव्यवस्थेत काही प्रमाणात धुगधुगी निर्माण होईल, असंही राज यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!