#CoronaAurangabadUpdate : सुधारित वृत्त : ३२ पैकी १५ रुग्ण कोरोनामुक्त, १४ रुग्णांवर उपचार सुरु, ३ मृत्यू

औरंगाबाद शहरातील कोविड 19 चा संसर्ग झालेल्या रुग्णांचा तेराव्या दिवशीचा दुसरा अहवाल निगेटीव्ह आल्याने कोरोनामुक्त झालेल्या पाच जणांना आज जिल्हा सामान्य रुग्णालयातून घरी पाठविले आहे, अशी माहिती घाटीचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान आज कोरोना रुग्णांची संख्या 32 झाली असून आजपर्यंत 15 रुग्णांवर यशस्वी उपचार केले असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली आहे. या रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे अभिनंदन केले आहे.
आज आढळून आलेल्या दोन रुग्णांमध्ये हिलाल कॉलनीतील 58 वर्षीय पुरुष आणि असेफिया कॉलनीतील ६५ महिलेचा समावेश आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ३२ झाली आहे. दरम्यान आधीची एक महिला आणि आता आजपर्यंत 14 असे एकूण कोरोनाचे 15 रुग्ण यशस्वी उपचारानंतर घरी पाठवण्यात आले सून त्यांना 14 दिवस काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे . रुग्णांना घरी पाठविताना महापौर नंदकुमार घोडेले, मिनी घाटीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांची विशेष उपस्थिती होती. जिल्ह्यात आजपर्यंत 32 कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत. काल पाचजण कोरोनामुक्त होऊन घरी परतले, त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज पुन्हा सहा जण कोरोनामुक्त झाल्याने 31 पैकी एकूण 14 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तीन जणांचा मृत्यू झाला. सध्या मिनी घाटीत 12 कोरोनाबाधितांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. दोघाजणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर घाटीत एका कोरोनाबाधितावर उपचार सुरू आहे.
आज एक 65 वर्षीय महिलेचा स्वॅब पॉझिटिव्ह आलेला आहे. काल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णास घाटी येथे संदर्भीत करण्यात आलेले आहे. म्हणून सध्या मिनी घाटीत एकूण दोन कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आज 96 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 56 जणांना घरीच अलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. घाटीतील प्रयोगशाळेत 46 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहेत. तर काल आणि आजचे मिळून 44 जणांचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. प्रयोगशाळेतून एकूण 48 स्वॅबचे नमुने येणे बाकी आहे, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाले.
घाटीत दोघांवर उपचार सुरू
घाटीत 60 वर्षीय व्यक्तीची कोरोना चाचणी रविवारी (दि.19) पॉझिटिव्ह आली. या रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. या रुग्णाला घाटी रुग्णालयात 19 रोजी सकाळी भरती करण्यात आले. तत्काळ त्यांचा कोविड 19 चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला. रात्री उशीरा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या त्यांच्यावर घाटीतील डॉक्टरांकडून योग्य ते उपचार सुरू आहेत. आज 20 रोजी दुपारी 04 वाजेपर्यंत 24 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 09 जणांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते, ते निगेटीव्ह आले आहेत. सध्या घाटीच्या डेडिकेटेड कोविड रुग्णालयात (DCH) एकूण 27 जण भरती आहेत. भरतीतील रुग्णांपैकी मिनी घाटीतून एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास घाटीमध्ये संदर्भीत करण्यात आलेले आहे. तीन रुग्णांना उपचारांती घरी पाठविलेले आहे. तर मागील चोविस तासात रूग्णालयातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यांचीही कोविड चाचणी निगेटीव्ह आलेली आहे, असे घाटीचे नोडल अधिकारी (माध्यम समन्वयक) डॉ. अरविंद गायकवाड म्हणाले.