#CoronaUpdateAurangabad : औरंगाबाद शहरात आज आणि उद्या दुपारी दिड ते रात्री ११ पर्यंत कडक कर्फ्यूचे आदेश

औरंगाबाद शहरात दि. 20 आणि दि. 21 रोजी कडक कर्फ्यू चे आदेश देण्यात आले असून या आदेशानुसार दुपारी दीड ते रात्री अकरा पर्यंत राहील कर्फ्यू राहील असे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी कळविले आहे.
औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आज जारी केलेल्या आदेशानुसार फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) प्रमाणे शहरातील नागरिकांना मनाई आदेश दिला आहे. या आदेशात पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे की औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या वैद्यकीय व तत्सम अत्यावश्यक सेवा आस्थापना शेतकरी व दुग्ध उत्पादक यांना त्यांचे दैनंदिन कामाबाबत परवानगी देण्यात आलेल्या औद्योगिक आस्थापना व त्यांचे कामगार राज्य व केंद्र शासनाचे कर्तव्यावर असलेले अधिकारी कर्मचारी यांना वगळता सर्व प्रकारच्या अस्थापना बंद राहतील सदर चा आदेश दिनांक 20 एप्रिल 2020 ते 21 एप्रिल रोजी दररोज दुपारी दीड ते रात्री अकरा वाजेच्या दरम्यान लागू करीत आहे सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध साथरोग अधिनियम कायदा 2005 व भारतीय दंडविधान प्रमाणे कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.