#Aurangabad : कोरोनो पॉझिटिव्ह असलेल्या तिस-या रुग्णांचा मृत्यू, अजून एक पंधरा वर्षीय पॉझिटिव्ह रुग्ण आढळला
Advertisements
Advertisements
औरंगाबादश शहरातील65 वर्षीय कोविड पॉझिटिव्ह असलेल्या महिलेचा आज सकाळी 6.50 वाजता उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. या महिलेची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना 13 एप्रिल रोजी घाटीत भरती करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांचे लाळेचे नमुने घेतले होते. त्याचा अहवाल 16 एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला होता. तत्पूर्वी त्यांना एका खासगी रुग्णालयातून घाटीत संदर्भित करण्यात आले होते. न्यूमोनिया, मधुमेह व उच्च रक्तदाब आजाराचा त्यांना त्रासही होता, असे घाटीचे डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले. तसेच काल (शुक्रवारी) रात्री उशिरा शहरातील अन्य एका पंधरा वर्षीय रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे मिनी घाटीचे डॉ. प्रदीप कुलकर्णी म्हणाले.
Advertisements
