Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : कोरोनाग्रस्तांना मदत करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस बरोबर १५ पोलिसांनाही बाधा…

Spread the love

ताज्या बातमीनुसार महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढत होत असून आता राज्यातील कोरोनाग्रस्तांनी तीन  हजाराचा टप्पा पार केला आहे. तसंच मुंबईतही कोरोनाचे नवे १०७ रुग्ण समोर आले आहेत. जवळपास चार आठवड्याच्या लॉकडाऊनंतरही राज्यातील कोरोनारुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील ३ हजार ८१ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये नव्या १६५ रुग्णांचा समावेश आहे. मुंबईत मागील २४ तासांमध्ये ५ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता १५ वर गेली आहे.

देशभरातही  कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या संकटात मैदानात जाऊन लढणाऱ्या अनेक डॉक्टर, नर्सेस आणि पोलीस यांनाही कोरोनाने विळखा घातला आहे. दरम्यान मुंबईतील  फायर ब्रिगेडच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची पत्नी आणि मुलगी या दोघी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. उपचारासाठी दोघींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी अधिकारी आणि त्यांच्या मुलाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र सुरक्षिततेसाठी त्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.रुग्णांना भेटण्यासाठी हा अधिकारी  कार्यालयाची गाडी घेवून जात असल्यामुळे प्रकरण उघडकीस आल्याचे सांगितले जात आहे. मात्र यामुळे इतर सहकाऱ्यांना लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यानंतर मुंबईतील अग्निशमन दलाच्या हेडक्वार्टरचे दोन मजले क्वारंटाइन करण्यात आले आहे. याशिवाय इतर दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही क्वारंटाइन करण्यात आलं आहे.  इतर सहकाऱ्यांना लागण होण्याची भीती वाटतं असल्याची माहिती. यापूर्वी कार्यालयात आलेल्यांची तपासणी केली जात आहे. याशिवाय या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांचीही तपासणी केली जात आहे.

परभणीतील पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची कथा…

महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढत असताना, ग्रीन झोनमध्ये असलेल्या परभणी जिल्ह्यात आज, गुरुवारी करोनाचा पहिलाच रुग्ण आढळला. त्यामुळे  खळबळ उडाली. हा कोरोनाबाधित तरूण पुण्याहून पायी परभणीत आला होता. हा २१ वर्षीय तरूण परभणी शहरातील एमआयडीसी परिसरात राहत होता. राज्यातील ग्रीन झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यात परभणीचा समावेश होता. जिल्हा, आरोग्य प्रशासन व पोलीस प्रशासनाने अहोरात्र मेहनत घेऊन जिल्ह्याला एक आरोग्यकवच तयार केले होते. परंतु पुणे, मुंबई व इतर जिल्ह्यांतून मजूर परत आपल्या जिल्ह्यात घुसण्यासाठी या ना त्या मार्गाचा अवलंब करत आहेत. ही बाब वेळोवेळी उघड झाली आहे. प्रशासनाला चकवा देत परभणी शहरातील एमआयडीसी परिसरात राहत असलेला एक रुग्ण करोनाबाधित असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

या तरुणाने पुण्यावरून पायी प्रवास करत ११ तारखेला परभणीत शहरात प्रवेश केला असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली. १३ एप्रिल रोजी हा तरुण सर्दी, खोकल्याने जास्त आजारी पडल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. त्याचा अहवाल आज सकाळी अकरा वाजता प्राप्त झाले. दरम्यान अहवालात सदर तरुण करोना पॉझिटिव्ह असल्याचे नमूद केले आहे. अहवाल गुरूवारी प्राप्त झाल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या रुग्णाची स्वतंत्र अशी व्यवस्था केली असून, त्याला देखरेखीखाली ठेवलं असल्याची  माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली आहे. दरम्यान ज्या परिसरात हा रुग्ण आढळला आहे. तो संपूर्ण परिसर सील करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. आरोग्य कर्मचारी आता त्याच्या सहवासातील कुटुंबीयांची तपासणी करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रात काय चाललंय ? 

नाशिक जिल्ह्यातील रुग्णांमध्ये मालेगावातील  कोरोनाग्रस्तांची संख्या ४८ झाली असून यात नाशिक शहरातील ५ व इतर तालुक्यांतील तिघांचा समावेश

पत्रकार राहुल कुलकर्णी  यांना त्यांनी दिलेल्या बातमीमुळं वांद्रे येथे मजुरांची गर्दी झाल्याच्या आरोपावरून  अटक करण्यात आली होती .  दरम्यान १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर वांद्रे येथील दंडाधिकारी न्यायालयानं केला जामीन मंजूर केला आहे.

अकोल्यातील पहिल्या करोना पॉझिटिव्ह रुग्णासह आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह

शिवाजीनगर वाकडेवाडी येथील ६५ वर्षीय करोनाबाधित महिलेचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू; झाल्यामुळे पुण्यातील बळींची संख्या ४४ वर गेली आहे. या महिलेला  रक्तदाबाचा त्रास होता

आपलं सरकार

Click to listen highlighted text!