Aurangabad News Update : पोलिस कर्मचा-यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी – आयुक्त चिरंजीव प्रसाद

पोलिस आयुक्तांनी घेतला शहरातील बंदोबस्ताचा आढावा
औरंंंगाबाद : कोरोना विषाणूचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत चालला असून बंदोबस्तावरील पोलिस कर्मचा-यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असा संदेश पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिला आहे. मंगळवारी (दि.१४) पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी शहरातील विविध भागांना भेटी देवून शहरातील बंदोबस्ताचा आढावा घेतला.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात गेल्या २४ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गेल्या २० ते २२ दिवसापासून शहरातील विविध भागात पोलसांचे फिक्स पॉईन्ट लावण्यात आले असून त्या ठिकाण्ीा पोलिस कर्मचा-यांकडून येणा-या-जाणा-या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान, मंगळवारी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी शहरातील टीव्ही सेंटर, भडकलगेट, वरद गणेश मंदीर चौक, आंबेडकर चौक, जिल्हाधिकारी कार्यालय चौक, जळगांव टी पॉईन्ट, हर्सुल टी पॉईन्ट आदी भागातील विविध चौकांना भेटी देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी बंदोबस्तावरील कर्मचा-यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांना रूमालापासून मास्क तयार करून कसा वापरावा याबाबतही मार्गदर्शन केले.