कोरोना झाल्याचा आरोप करून पीडित कुटुंबियांना मारहाण , पोलिसात गुन्हा दाखल

बीड जिल्ह्यातील देवठाण गावातील एका कुटुंबियाला , तुझ्या कुटुंबातील लोकांना कोरोना झाला आहे, असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करत काठीने तरुणाला मारहाण केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात मारहाण झालेल्या तरुणाच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून या तरुणावर धारूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आहे. बीडमधील धारुर तालुक्यातील देवठाणा गावात ही घटना घडली असल्याचे वृत्त असून या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
या विषयी पोलिसांनी सांगितले कि , धारुर तालुक्यातील देवठाणा गावातील ऋषिकेश बंडू वावळकर यांच्या घरात घुसून तुझ्या आजी-आजोबा, मामी, मावशीला कोरोना रोग झाला आहे. त्यांना गावाबाहेर काढा असे म्हणत तिघा आरोपींनी शिवीगाळ केली. तसंच लाठी-काठीने मारहाण केली, अशी तक्रार पीडित कुटुंबाने पोलिसात केली आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी संचारबंदीचे आदेश डावलल्याप्रकरणी आरोपी, फिर्यादीसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.