#CoronaVirus : Aurangabad NewsUpdate : औरंगाबादेत वाढले तीन नवे कोरोनाबाधित रुग्ण….

औरंगाबाद जिल्हा सामान्य रूग्णालयात आज कोरोनासारखी लक्षणे आढळत असलेली नवीन आठ रूग्ण भरती झालेली आहेत. तिघाजणांचे अहवाल सकारात्मक आले असल्याचे रुग्णालयाचे डॉ.प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले. एकूण १५५ रुग्णांची आज तपासणी करण्यात आली. यामध्ये ६३ जणांना घरीच अलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला. एकूण ८८ जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात (घाटी) पाठविलेले आहेत. त्यापैकी ४३ जणांचे अहवाल नकारात्मक आहेत. सध्या एकूण १४ कोरोनाबाधित रुग्णांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ८५ रूग्ण देखरेखीखाली आहेत, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.