Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालल्याने मुंबईकर चिंताग्रस्त…

Spread the love

राज्यभरात कोरोनाग्रस्थांची संख्या वाढत असून गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबईतल्या करोनाग्रस्तांची संख्या ही ४९० वरुन थेट ५९० झाली  असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. तर मागील चोवीस तासांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन मृत्यू झालेल्यांची संख्या चाळीसवर पोहचली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. काल दिवसभरात मुंबई – ११६, पुणे – १८, अहमदनगर – ३, बुलडाणा – २, ठाणे – २, नागपूर – ३, सातारा -१, औरंगाबाद – ३, रत्नागिरी – १, सांगली – १ आदी रुग्णांचा समावेश आहे. करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यानं राज्य सरकारची चिंतेतही भर पडली आहे.  काल  दिवसभरात राज्यात १५० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकट्या मुंबईत ११६ रुग्ण सापडले आहेत. राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा आता हजाराच्या वर पोहोचला आहे. दिवसभरात राज्यातील १५० जणांचे चाचणी अहवाल करोनाकरिता पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सगळ्यांना पुन्हा एकदा  या निमित्ताने सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केलं आहे. ट्विटर व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधला आहे. सगळ्या उपाय योजना करण्यात येत आहेत. मात्र नागरिकांनी घराबाहेर न पडून आम्हाला पूर्ण सहकार्य करावे असंही त्यांनी म्हटलं आहे. असं असलं तरीही मुंबईची चिंता वाढवणारी बातमीच समोर आली आहे. कारण गेल्या चोवीस तासांमध्ये १०० रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे शहरातील करोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील चार भागांमध्ये संचारबंदीची कडक अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातला अध्यादेशही निघाला असून आज (दि.७) रात्री ७ वाजल्यापासून १४ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच या काळात रुग्णालयं आणि मेडिकल्स वगळता इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकानं केवळ दोनच तास खुली राहणार आहेत. करोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार, आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत असली तरी, या विषाणूचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. राज्यातील करोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. आज दिवसभरात राज्यात दीडशे नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळं आता करोनाबाधितांचा आकडा १०१८वर गेला आहे. मुंबईत ११६ नवे रुग्ण सापडले आहेत.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!