Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : तबलिगी मरकज मध्ये सहभागी झालेल्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तपासणी करून घ्यावी अन्यथा कठोर कारवाई , अनिल देशमुख

Spread the love

निजामुद्दीन दिल्ली येथील तबलिगी मरकजमध्ये जे लोक सहभागी झाले होते त्यातले ५० ते ६० जण बेपत्ता आहेत. त्यांना सूचित करण्यात येतं आहे की त्यांनी लवकरात लवकर जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा आणि चाचणी करुन क्वारंटाइन व्हावे असे आवाहन गृह मंत्रालयाने केले  असून असे  न केल्यास कठोर कारवाई केली जाईल असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. गृह खात्याच्या म्हणण्यानुसार देशभरात करोनाचे ५०८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासात समोर आलेली ही संख्या आहे. गेल्या २४ तासांमध्ये १३ मृत्यू झाले आहेत. तर करोनाग्रस्तांची संख्या ही आता ४७८९ वर पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत करोनाची लागण झाल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या १२४ झाली आहे.

देशभरात कोरोनाची चर्चा चालू असताना अचानक दिल्लीतील निजामुद्दीन या ठिकाणी झालेल्या तबलिगी जमातीच्या इजतेमाची चर्चा सुरु झाली आणि आधीच मुस्लिमांच्या विरोधात असलेल्या मेनस्ट्रीम मीडियातील काही वृत्त वाहिन्यांनी या तबलिगी जमातीच्या  लोकांच्या अशा काही बातम्या दिल्या कि , जणू हे अतिरेकी लोक आहेत किंवा कोरोनाग्रस्त लोक  देशभरात “कोरोना -जेहाद ” पसरविण्यासाठी निघाले आहेत आणि हि माध्यमे मोठी लढाई लढत आहेत. मग झाले ते हि हि माध्यमे सांगत आहेत आणि नाही झाले ते हि सांगत आहेत . सोशल मीडियावरच्या या समाजाविषयीच्या अफवा तर इतक्या वाढल्या कि , पोलिसांना त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारावा लागला. तर काही माध्यमांनी फॅक्ट चेक मध्ये अनेक वादग्रस्त व्हायरल व्हिडीओचा पर्दापाश केला, तरीही अफ़वाखोरांचे समाधान होताना दिसत नाही. हे कमी म्हणून कि काय केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाचे जबाबदार अधिकारी लव अग्रवाल यांनी तर या माध्यमांच्याही पुढे जात या तबलिगी लोकांमुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे अधिकृत प्रतिपादन केले याला काय म्हणायचे ? एकीकडे सांगायचे कि , कोरोनग्रस्तांची ओळख सांगायची नाही आणि दुसरीकडे सरकारच्या वतीने एखाद्या विशिष्ट समुदायाचे नाव घ्यायचे हि कोणती नैतिकता आहे?

या पेक्षाही आश्चर्याची आणि धक्कादायक बाब म्हणजे लॉकडाऊनच्या काळात दिल्लीच्या कार्यक्रमात सहभागी झालेले तबलिगी जमातचे  हे लोक  सैरभैर झाले आणि का कुणास ठाऊक गुन्हेगारांप्रमाणे लपत फिरू लागले आणि सगळीकडून केवळ त्यांच्यावरच नव्हे तर एकूण या समाजावरच टीका सुरु झाली . त्यात पुन्हा अफवा . दिल्लीत या कार्यक्रमासाठी गेलेल्या लोकांचा देशातील सर्वच राज्यात शोध सुरु झाला. धरपकड सुरु झाली तरीही ए लोक समोर येण्याऐवजी अजून लपून बसले आहेत. हे लक्षात घेऊन राज्य शासनाने म्हटले आहे कि , दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात सहभागी झालेले ५० ते ६० जण महाराष्ट्रात परतले आणि त्यांनी त्यांचे मोबाइल बंद केले आहेत. पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा तूर्तास सापडत नाही. मात्र पोलीस राज्यभरातल्या विविध ठिकाणी या सगळ्यांचा शोध घेत आहेत. ५० ते ६० जण हे मोबाइल फोन बंद करुन लपण्याचा प्रयत्न करत आहेत असे  महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने म्हटले  आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!