#Aurangabad Crime : तबलिगी धर्मगुरूच्या विरोधात सोशल मीडियावर टाकली पोस्ट, डाॅक्टरवर गुन्हा दाखल

औरंगाबाद – दिल्लीतील तबलिगी जमात कार्यक्रमाच्या आयोजका विरुध्द बदनामी कारक पोस्ट व्हाॅट्सअॅपवर व्हायरल केल्या प्रकरणी एन -४ परिसरातील एका डाॅक्टर विरुध्द पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली
डाॅ.संभाजी गोविंद चितळे(३८) असे आरोपीचे नाव असून ते कामगार चौकातील काॅस्मो हाॅस्पिटलमधे काम करतात.तबलिगी जमातचे आयोजक मौलाना साद यांचा फोटो व्हाॅट्सअॅपवर व्हायरल करुन त्याखाली या माणसाबद्दल काही माहिती असल्यास आपल्या नजीकच्या पोलिसांना कळवा असे लिहीले होते.या मुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची परिस्थिती दिसत असल्यामुळै डाॅ.चितळेला ताब्यात घेत त्याच्यावर अदखल पात्र गुन्हा दाखल करुन त्यास समज देण्यात आली आहे.वरील कारवाई एपीआय घन:शाम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रभाकर सोनवणे व पोलिस कर्मचारी रमेश सांगळे यांनी पार पाडली