Aurangabad Crime : दोन समाजात धार्मीक तेढ निर्माण करणा-या दोघांविरूध्द गुन्हा दाखल

औरंंंगाबाद : दोन विभिन्न समाजात तेढ निर्माण होईल असा मजवूâर सोशल मिडियावर टाकणा-या दोघांविरूध्द विविध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवनसिंग दिलीपसिंग (वय २४, रा.वायवा, जि.बलिया, उत्तरप्रदेश, ह.मु. माऊली हॉस्टेल, कांचनवाडी) याने ३ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आपल्या मोबाईलच्या स्टेटसवर महापुरूषाविषयी आक्षेपार्ह आणि दोन समाजात तेढ निर्माण होईल असा मजकूर ठेवला होता. याप्रकरणी कैलास यशवंत दिवेकर (वय २६, रा.कांचनवाडी, पैठण रोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुस-या घटनेत, रांजणगाव शेणपुंजी येथील न्यु श्रीरामनगर येथे राहणा-या वाल्मीक रावसाहेब फटांगडे (वय २८) यांनी २ एप्रिल रोजी सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास फेसबुकवर दोन समाजात तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजवूâर पोस्ट केला होता. याप्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार राजू मोरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक चेतन ओगले करीत आहेत.