Aurangabad : सुरक्षीत अंतर ठेवून भाजीपाला विक्री करा – उपायुक्त मिना मकवाना

औरंंंगाबाद : जाधववाडी येथील भाजीमंडईत भाजीपाला विव्रेâत्यांनी सुरक्षीत अंतर ठेवूनच भाजीपाला विक्री करावा अशा सुचना पोलिस उपायुक्त मिना मकवाना यांनी विव्रेâत्यांना दिल्या आहेत. पोलिस उपायुक्त मिना मकवाना, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह मनपाचे अधिकारी व मार्वेâट कमेटीच्या अधिकाNयांनी सोमवारी (दि.३०) जाधववाडी भाजीमंडईचा आढावा घेतला.
कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाय योजना केल्या जात आहेत. असे असले तरी जाधववाडी येथील भाजीमंडईत भाजीपाला, फळ विव्रेâते कोणत्याही प्रकारे सुरक्षेचे उपाय न करता भाजीपाला विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी वारंवार सुचना करूनही भाजीपाला विव्रेâते व खरेदीसाठी आलेले ग्राहक पोलिसांच्या सुचनांना जुमानत नव्हते.
सोमवारी पोलिस उपायुक्त मिना मकवाना, महापौर नंदकुमार घोडेले, जाधववाडी मार्वेâट कमेटीचे अधिकारी, सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी, उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, सिडको वाहतूक शाखेचे निरीक्षक वैâलास देशमाने आदींनी जाधवमंडी भाजीमंडईला भेट दिली. त्यावेळी ग्राहक कोणतेही खबरदारीचे उपाय न घेता भाजीपाला खरेदी करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.