ह्रदयद्रावक : आत्महत्या केलेल्या पतीवर अंत्यसंस्कार होत नाहीत तोच पत्नीनेही घेतला गळफास !!

परभणी जिल्ह्यात पत्नीच्या अपघाती निधनानंतर पटीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलेली असतानाच बीड जिल्ह्यातील पतीने आत्महत्या केल्यानंतर अंत्यविधी होताच पत्नीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे घडली आहे. पतीच्या दुःखातून तरुणीने हे पाऊल उचलल्याचं नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. सदर तरुणीच्या पतीने बुधवारी औरंगाबाद येथे आत्महत्या केली होती तर आज पत्नीने स्वतः स्वतः आत्महत्या करून अखेरचा श्वास घेत आपले आयुष्य संपवले. एक वर्षापूर्वीच लग्न झालेल्या या जोडप्याने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी याविषयी दिलेली अधिक माहिती अशी कि , गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील रणजित जाधव (वय 22) व मिनाक्षी जाधव (वय 20) यांचा एक वर्षापूर्वी विवाह झाला होता. रणजित जाधव हा औरंगाबाद येथे एका खाजगी कंपनीत नोकरी करत असल्याने तो विवाहानंतर पत्नी मिनाक्षीसह औरंगाबाद येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. दरम्यान बुधवारी रणजित जाधव याने औरंगाबाद येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान रणजित जाधव याच्या आत्महत्येनंतर शवविच्छेदन करुन पार्थिव बुधवारी रात्री उशिरा चकलांबा या गावी आणून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रणजित याने आत्महत्या का केली? याचे कारण अस्पष्ट असताना आणि नातेवाईक दुःखात असतानाच आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास घरालगत असलेल्या शौचालयात गळफास घेऊन मिनाक्षी हिनेदेखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, मिनाक्षीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.