Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : अल्पवयीन प्रेयसीला “त्याने” पळवून आणले खरे पण अलगद पोलिसांच्या तावडीत सापडले !!

Spread the love

औरंगाबाद – उत्तरप्रदेशातील लोहियानगर ता.गौर जि.बस्ती येथून पळून आलेल्या आधुनिक अल्पवयीन लैला- मजनूला औरंगाबाद स्टेशनवर येताच पोलिसांच्या नजरेत कैद झाले. वेदांतनगर पोलिसांनी त्यांना बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास ताब्यात घेतले. चौकशीअंती खरा प्रकार उघडकीस आल्यानंतर वेदांतनगर पोलिसांनी त्यांची खबरबात गौर पोलिसांना दिली तेंव्हा उघड झाले कि , अल्पवयीन प्रियकराच्या विरोधात मुलीच्या पालकांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान त्यांना ताब्यात घेण्यासाठी गौर पोलिसांचे एक पथक औरंगाबादकडे येण्यास निघाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान दोन्ही अल्पवयीनांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे.

या प्रकरणी वेदांतनगर पोलिसांनी , गौर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल पांडे व पिडीतांच्या पालकांना याबाबत कळविले आहे. त्याचे झाले असे कि , १५ वर्षाची प्रेयसी (नाव बदलले आहे) आणि १७ वर्षीय प्रियकर हे दोघेही गौर येथील लोहियानगर येथील रहिवासी आहेत.त्या दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेत भावी आयुष्याची स्वप्न रंगविली असतानाच याची कुणकुण तिच्या पालकांना लागताच त्यांनी तिचे लग्न जुळविण्याच्या हालचाली सुरु केल्याने त्या दोघांनी २ मार्च रोजी आपल्या घरातून धूम ठोकली  आणि रेल्वेने थेट औरंगाबाद गाठले. दरम्यान अल्पवयीन लैला -मजनूची हि जोडी औरंगाबादेत रेल्वेस्टेशनवर उतरल्यावर दोघांच्या संशयास्पद हालचाली पाहुन वेदांतनगर पोलिसांनी दोघांची चौकशी केली. अचानक समोर पोलीस आल्यामुळे गर्भगळीत झालेल्या जोडप्याने खरा प्रकार सांगितला. दरम्यान पोलिस तपासात उघंड झाले की, हा अल्पवयीन प्रियकर औरंगाबादेत काही दिवसांपासून खाजगी नौकरी करीत होता. आपल्या या प्रेयसीचा फोन आल्यावर  आपण तिला लोहियानगरहून औरंगाबादला  घेऊन आल्याचा जबाब सुरेश ने वेदांतनगर पोलिसांना दिला.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांतनगर पोलिस करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!