Aurangabad : जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसे तर्फे मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी मोहीम

कविश्रेष्ठ वि वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची जयंती अर्थात जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सि डको कनॉट चौकात “मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी” मोहीम राबविण्यात आली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचे राज्य सरचिटणीस सुभाष मेहेर यांनी प्रथम स्वाक्षरी करुन उपक्रमाची सुरुवात केली. आपली स्वाक्षरी मराठीत असण्याची प्रेरणा मिळावी यासाठी गेल्या सहा वर्षांपासून आम्ही हा उपक्रम राबवित आहोत, असे उपक्रमाचे आयोजक उपशहर अध्यक्ष आशिष सुरडकर यांनी सांगितले. तसेच यावेळी सुभाष मेहेर यांनी मराठी माणसानेच मराठी भाषेसाठी उभे राहणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन केले. मोहिमेत शेकडो नागरिकांनी यावेळी सही करून सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशुतोष राजकडे, सागर राजपूत, युवराज गवई, कौस्तुभ भाले, कमलेश राजकडे यांनी परिश्रम घेतले. मराठी स्वाक्षरी उपक्रमा करिताअशोक पवार, विद्या देगलूरकर, श्रुती काटे, शामल बहाळकर, भावना गुप्ता, अनुप खर्चे, कृष्णा मुगटकर, चंदू नवपुते, निलेश कवडे, नीरज बरेजा, दीपक पवार, संतोष पवार, प्रदीप बावणे यांच्या सह स्थनिक नागरिकांनी प्रचंड उल्हासाने सहभाग घेतला.