ट्रक चालकाच्या तक्रारीनंतर शबाना आझमीच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Maharashtra: An FIR has been registered against Amlesh Kamat, driver of Shabana Azmi in Khalapur on a complaint filed by truck driver. The FIR reads,"due to rash driving by the driver, the car hit the moving truck on Pune-Mumbai Expressway which resulted in the accident."
— ANI (@ANI) January 18, 2020
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शनिवारी खालापूर टोलनाक्याजवळ काल अपघात झाला होता. या अपघातात शबाना आझमी यांची कार मागून धडकली आणि हा अपघात घडला. मात्र या प्रकरणी ट्रकचालकाने खालापूर येथे कारचालक अमलेश कामतविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रायगड पोलिसांनी कारचालकाविरोधात कलम २७९ आणि ३३७ आणि मोटार वाहन अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
ट्रक चालकाच्या म्हणण्यानुसार ‘शबाना आझमी यांचा कारचालक वेगाने गाडी चालवत होता. त्यामुळे त्याच्या गाडीची ट्रकला धडक बसली. यामध्ये त्याचा बेजबाबदारपणा होता’. शबाना आझमी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करत असताना खालापूर टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. यामध्ये त्या आणि कारचालक जखमी झाले. त्यांच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शबाना आझमी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.