Aurangabad : बलात्कार प्रकरणातील आरोपीने विष घेऊन केला पोलिसांना फोन…

औरंगाबाद – गेल्या जून २०१९ मधे बलात्काराच्या गुन्ह्यात जामिन मिळालेल्या आरोपीला जबिंदा लाॅन्सवर आज संध्याकाळी (२/॰१/२०)साडेपाच च्यासुमारास प्रेयसीशी झालेल्या भांडणामुळै वैतागून विष पिऊन जीव देण्याचा प्रयत्न करतांना जवाहरनगर पोलिसांनी तत्परता दाखवत घाटी रुग्णालयात दाखल केले.
अजय आहेर (२९) रा.लाख खंडाळा ता.वैजापूर असे आरोपीचे नाव आहे. जून २०१९ मधे त्याच्या प्रेयसीने अजय च्या विरोधात बलात्काराची फिर्याद जवाहरनगर पोलिसांकडे दिली होती. त्यामुळे अजय आहेर ला अटक करण्यात आली. या प्रकरणात तो जामिनावर सुटल्यानंतर अजयला बुधवारी रात्री ११.३०वा. प्रेयसीची तीव्रतेने आठवण झाली व अजयने तिला शुंभूनगरमधे बोलावून घेतले. हा प्रकार अजय च्या प्रेयसीने एपीआय श्रध्दा वायदंडे यांना बुधवारी रात्री १२ वा. फोन करुन सांगितला.
दरम्यान अजय आणि त्याच्या प्रेयसीची निवांत भेट झाल्यावर दोघांमधे मारामार्या झाल्या दोघांनीही पुन्हा एपीआय वायदंडेंना फोन करुन सांगितले.त्यांनी दोघांनाही पोलिस ठाण्यात येऊन नव्याने तक्रार देण्यास सांगितले. बुधवारी रात्री दोघेही जवाहरनगर पोलिस ठाण्यात गेले. पण पोलिसांनी तक्रार घेण्यापूर्वी दोघांनाही मेडिकल चाचणी करवून घेण्यासाठी पोलिसांनी तपासणीसाठी मेमो देत घाटी रुग्णालयात धाडले. पण मेडिकल झाल्यावर दोघेही पुन्हा पोलिस ठाण्यात आले नाही.पण आज संध्याकाळी ५.२०वा. आरोपी अजयने एपीआय वायदंडे यांना फोन करुन सांगितले की, जबिंदा लाॅन्सवर त्याने विष घेतले आहे.पण विष घेतल्यानंतर अजय स्वता:ला वाचवण्याकरता जवाहरनगर पोलिसांकडे फोनवर मदतीची याचना करंत होता. म्हणून एपीआय श्रध्दा वायदंडे यांनी कर्मचार्यांचे एक पथक सोबत घेत जबिंदा लाॅन्सवर धाव घेतली व अजय आहेरला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले.या कामगिरीत पोलिस कर्मचारी संदीप जाधव, योगेश चव्हाण, पांडुरंगतुपे, बाबासाहेब जमधडे यांनी सहभाग घेतला. वरील प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात अजय आहेर विरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरा पर्यंत सुरु होती.