Aurangabad Crime : पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून युवकाची आत्महत्या, वर्षभरानंतर सुनेसह तिच्या प्रियकराविरूध्द गुन्हा दाखल

Advertisements
Advertisements
Spread the love
औरंंंगाबाद : पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून  ३० वर्षीय युवकाने वर्षभरापुर्वी गळफास घेवून आत्महत्या केली होती. याप्रकरणी मयत युवकाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सुनेसह तिच्या प्रियकराविरूध्द दौलताबाद पोलिस ठाण्यात वर्षभरानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौलताबाद परिसरातील रहिवासी असलेल्या कारभारी किसनराव गायकवाड असे मयत युवकाचे नाव असून त्याने १२ सप्टेंबर २०१८ रोजी भांगसी माता गडाच्या पायथ्याशी गळफास घेवून आत्महत्या केली होती. कारभारी गायकवाड याच्या घरात पप्पू मोरे हा भाडेकरू म्हणून राहत होता. दरम्यानच्या काळात पप्पू मोरे याचे कारभारी गायकवाडच्या पत्नीसोबत सुत जुळले होते. पत्नीचे पप्पू मोरे सोबत असलेल्या अनैतिक संबंधाची कुणकुण लागल्यावर कारभारी गायकवाड याने पप्पू मोरे याची खोली रिकामी करून घेत त्याला हाकलून दिले होते. त्यानंतरही कारभारीची पत्नी व पप्पू मोरे यांचे अनैतिक संबंध सुरूच होते. या काळात गायकवाडने पत्नीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता तिने उलट आपल्या पतीलाच शिवीगाळ करून आत्महत्या करण्यास भाग पाडले होते.
याप्रकरणी वर्षभरानंतर कारभारी गायकवाड याच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सुनेसह तिच्या प्रियकराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक कदम करीत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!