Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारतीय पासपोर्टवर कमळ छापल्याने विरोधकांचा संसदेत हंगामा

Spread the love

भारतीय पासपोर्टवर कमळाच्या चिन्हाचा वापर करण्यात आल्याने विरोधी पक्षाने त्यावर जोरदार आक्षेप घेतला असून  विरोधकांचा विरोध लक्षात घेऊन  त्यावर परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने खुलासा केला आहे. सेक्युरिटी फिचर्सला अधिक मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून टप्प्याटप्प्याने देशातील इतर प्रतिकांचाही पासपोर्टवर वापर करण्यात येणार असल्याचा खुलासा  परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.

केरळच्या कोझिकोड येथे कमळाचे  चिन्हं असलेले पासपोर्ट वाटप करण्यात आले होते. काँग्रेसचे खासदार एम. के. राघवन यांनी लोकसभेत शून्यप्रहरात हा मुद्दा लावून धरला. सरकारी संस्थांचे भगवेकरण करण्याचा भाजपने घाट घातला असून त्यामुळेच भाजपचे  निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाचा वापर पासपोर्टवर करण्यात आला असल्याचे  एका स्थानिक वृत्तपत्राने  वृत्त दिल्याचे  राघवन यांनी लोकसभेत सांगितले  होते.

लोकसभेत  हा मुद्दा उपस्थित झाल्याने परराष्ट्र मंत्रालयाने त्याची गंभीर दखल घेत त्यावर तात्काळ स्पष्टीकरण दिले  आहे. आपलं राष्ट्रीय प्रतिक असलेल्या फुलाचं चिन्हं पासपोर्टवर छापण्यात आलं आहे. बनावट पासपोर्ट ओळखण्यासाठी आणि सेक्युरिटी फिचर्स मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय नागरिक उड्डाण संघटनेच्या आदेशानंतरच सेक्युरिटी फिचर्स छापलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. मळाशिवाय टप्प्याटप्प्याने देशातील इतर प्रतिकांचाही पासपोर्टवर वापर करण्यात येणार आहे. आज पासपोर्टवर कमळाचं चिन्हं आहे, पुढच्या महिन्यात पासपोर्टवर वेगळं प्रतिक असेल. भारताशी संबंधितच प्रतिकांचा पासपोर्टवर वापर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!